औरंगाबादचे नाव बदलण्यास रामदास आठवले यांचा तीव्र विरोध

तुषार सोनवणे
Sunday, 3 January 2021

महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

मुंबई  : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याचा अट्टहास काही लोक करत आहेत; मात्र कोरोना पार्श्‍वभूमीवर असे वाद सरकारने बाजूला ठेवावेत. आता औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असून महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या औरंगाबादचे "संभाजीनगर' नामकरण करण्यावरून वाद पेटला आहे. कोरोनाच्या या काळात सामान्य जनता खडतर दिवसांना सामोरी जात असताना राज्याच्या विकासाचे विधायक मुद्दे बाजूला ठेऊन नामांतराचा मुद्दा राज्य सरकारने पुढे आणू नये. नामांतराच्या आंदोलनाची आम्ही धग भोगली आहे. त्यामुळे औरंगाबादचे आता नामांतर करू नये. औरंगाबादच्या नामांतरास रिपब्लिकन पक्षाचा विरोध राहील, असे रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानणारे आहोत; मात्र त्यांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करू नये, असे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले. 

Ramdas Athavale strongly opposes changing the name of Aurangabad to sambhajinagar

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athavale strongly opposes changing the name of Aurangabad to sambhajinagar