Mumbai Crime : सोनसाखळी चोरून ते पळाले पण पोलिसांनी पाठलाग करत आवळल्या मुसक्या

रामनगर पोलिसांची कामगिरी; 25 ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून रिक्षातून पळ काढला
ramnagar police action arrest theft chain snatching crime mumbai
ramnagar police action arrest theft chain snatching crime mumbaisakal

डोंबिवली - दुकानासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी रिक्षातील चोरट्यानी खेचले आणि पळ काढला. महिला तिच्या पतीने आरडा ओरडा केतच गस्तीवर असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता चोरांचा पाठलाग सुरू केला.

चोरटे रिक्षा स्टेशन परिसरात सोडून पळून जाणार तोच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. हा सर्व थरार शनिवारी रात्री 11 च्या दरम्यान डोंबिवली स्टेशन परिसरात घडला असून रामनगर पोलिसांनी लक्की चारी (वय 26) आणि सत्येंद्र जयस्वाल (वय 34) यांना अटक केली आहे.

डोंबिवली येथे राहणाऱ्या चित्रा नाडर (वय 48) या शनिवारी रात्री 11 च्या सुमारास जुना आयरे रोड येथील त्यांच्या व्यंकटेश्वरा किराणा दुकानासमोर उभ्या होत्या. तेवढ्यात एका रिक्षातुन दोन व्यक्ती आले त्यातील एकाने चित्रा यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांना जखमी करून गळ्यातील 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 25 ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून रिक्षातून पळ काढला.

ramnagar police action arrest theft chain snatching crime mumbai
Mumbai Crime : महिलांना अश्लील संदेश पाठवणारा सराईत बदमाश अटकेत

चित्रा, त्यांचे पती व मुलाने चोर चोर असा आरडाओरडा करत पाठलाग करायला सुरुवात केली. याचवेळी रामनगर पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी क्षणाचा विलंब न करता रिक्षाचा पाठलाग सुरू केला.

तसेच रामनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन देसाई, पोलीस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, शेखर कोळी, दिलीप कोती, नितीन सांगळे यांच्या पथकाने देखील चोरांचा पाठलाग केला.

ramnagar police action arrest theft chain snatching crime mumbai
Mumbai : नीलम गोर्हेंसह त्या तिघांवर अपात्रतेची कारवाई

चोरटे हे डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे रिक्षा सोडुन डोंबिवली रेल्वे स्टेशनकडे पळुन जात असताना, त्यांचा पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी लक्की व सत्येंद्र यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सोनसाखळी, रिक्षा व मोबाईल असा एकूण 2 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com