या पदाला नकार दिल्यामुळे खडसेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

पूजा विचारे
Friday, 23 October 2020

भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं खडसेंना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचं ठरवलं होतं. मात्र तब्येतीचं कारण देत नाथाभाऊंनी प्रदेशाध्यक्ष होण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट दानवेंनी आज केला आहे.

मुंबईः  गेल्या ४० वर्षांपासून भाजपमध्ये असणारे एकनाथ खडसे थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करतील.यावर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाथाभाऊंची मनधरणी करण्यात आम्ही अपयशी ठरलो असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं आहे. मी नाथाभाऊंशी कायम संपर्कात होतो असं म्हणत नाथाभाऊंच्या जाण्यानं पक्षाची हानी झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं खडसेंना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचं ठरवलं होतं. मात्र तब्येतीचं कारण देत नाथाभाऊंनी प्रदेशाध्यक्ष होण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट दानवेंनी आज केला आहे.

तसंच त्याकाळात पक्षाकडे विरोधी पक्षनेत्याची लाल दिव्याची गाडी एकमेव खडसे यांच्याकडे होती. नाथाभाऊंनी लाल दिव्याची गाडीसाठी प्रदेशाध्यक्ष पद नाकारल्याचं दानवेंनी म्हटलं आहे.

नाथाभाऊंसोबत कौटुंबिक संबंध होते. खडसेंचा वापर राष्ट्रवादीत फडणवीस आणि भाजपविरुद्ध होणार असल्याचंही दानवेंनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीनं विकासकामांसाठी खडसेंचा वापर करावा असा सल्लाही दानवेंनी दिला आहे. 

खडसेंनी मनातली खदखद जाहीर वाच्यता केली असंही दानवे म्हणाले आहेत. खडसेंनी भाजप सोडू नये, यासाठी प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं. एकेकाळी खडसेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे वाभाडे काढले असल्याचंही दानवे सांगायला विसरले नाहीत. 

Raosaheb Danve assassination was due Eknath Khadse refusal accept the post


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Danve assassination was due Eknath Khadse refusal accept the post