esakal | मुंबई: महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, FB वरुन झाली होती मैत्री
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

मुंबई: महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, FB वरुन मैत्री

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईत एका महिला पोलीस अधिकाऱ्याने (women police officer) तिच्यावर बलात्कार (rape) झाल्याचा आरोप केला आहे. तिने आरोपीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आरोपीने बँकिंग अधिकारी असल्याचा दावा करुन आपली फसवणूक केली. लग्नाचे आश्वासन (marriage promise) देऊन बलात्कार केल्याचा आरोप या महिला पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. शुक्रवारी पवई पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. (Rape on women police officer in mumbai files fir)

पीडित महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. पीडित महिलेने तक्रारीमध्ये आणखी दोघांची नावे घेतली आहेत. अन्य दोन जण आपल्याला धमकावून ब्लॅकमेलिंग करत असल्याचा महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप आहे.

हेही वाचा: अन् कार जमिनीत झाली गडप;पाहा व्हिडिओ

"मुख्य आरोपी औरंगाबादचा असून त्याने बँकिंग अधिकारी असल्याचा दावा केला होता. सोशल मीडियावरुन तो महिला पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आला व त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडित महिलेसोबतच्या प्रणयाच्या क्षणाचे व्हिडिओ मोबाइलमध्ये कैद केले व नंतर तिला ब्लॅकमेलिंग व अन्य प्रकारचा त्रास द्यायला सुरुवात केली" अशी माहिती एफआयआरच्या हवाल्याने तपास अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा: २०२४ निवडणूक एकत्र लढवण्याबाबत अजून काहीच ठरलेलं नाही - NCP

सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करायची धमकी देऊन मुख्य आरोपी आणि त्याचे दोन साथीदार पीडित महिलेला ब्लॅकमेल करत होते. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने पवई पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. आयपीसीच्या विविध कलमातंर्गत आरोपी विरोधात फसवणूक आणि बलात्काराचा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी अजून आरोपीला अटक केलेली नाही.

loading image
go to top