
कैलास म्हामले
कर्जत : कर्जत तालुक्यातील नेरळ-दामत ते आंबिवली गेटदरम्यान असलेल्या पेशवाई रस्त्याची भीषण दुरावस्था आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नागरिकांच्या समस्या लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांच्या पुढाकाराने दिनांक 16 जुलै रोजी नेरळ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रस्त्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि 20 जुलै रोजी साईबाबा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.