ताडदेव आरटीओत होतोय मोठा भ्रष्टाचार ? मनसे वाहतूक संघटनेचा आरोप

RTO
RTOsakal media

मुंबई : मुंबईकरांना आरसी स्मार्ट कार्डसाठी (RC Smart card) सहा महिन्यांचे वेटिंग असून, त्वरित आरसी स्मार्ट कार्ड हवं असल्यास त्यांना पैसे मोजावे लागत आहे. आधीच रोसमेर्टा कंपनीला (rosmerta company) वेळेत काम करत नसल्याने कोट्यवधींचा दंड (crore rupees fine) देण्यात आला आहे. त्यानंतरही कंपनीकडून नागरिकांना वेळेत सेवा दिली जात नाही. अनेकवेळा आरटीओ अधिकाऱ्यांकडे (RTO authorities) तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे विकास पवार (vikas pawar) यांनी आरोप केला आहे.

RTO
मुंबईतील कोरोनासाठीचे 91 टक्के बेड्स रिक्त; आयसीयू आणि व्हेंटिलेटरही रिकामे

परिवहन विभागाने रोसमेर्टा कंपनीला आरसी प्रिंटिंगचे राज्यभरातील कंत्राट दिले आहे. तर रोसमेर्टाने राज्यभरात सबकंत्राट देऊन आरसी प्रिंटिंगचे थातुरमातुर काम सुरू आहे. वाहन विक्री नंतर सुमारे एक महिन्यात आरसी स्मार्टकार्ड मिळणे अपेक्षित असतांना मुंबईकरांना सहा महिन्यांची वाट बघावी लागत आहे. स्मार्ट कार्ड संबंधित माहिती संग्रहित सुद्धा केली जात नसल्याच्या तक्रारी मनसे वाहतूक संघटनेने यापूर्वीच ताडदेव आरटीओ अधिकाऱ्यांकडे केल्या आहे.

सध्या ताडदेव आरटीओ मध्ये 8 हजार 500 आरसी प्रिंटिंग प्रलंबित आहे. पुरवठादार कंपनीकडे कोऱ्या आरसी स्मार्ट कार्ड नसल्याने नागरिकांना आरसी मिळत नाही. सध्या दोन हजार कोऱ्या आरसी आल्या असून अजूनही 6 हजार 500 कोऱ्या आरसीची गरज आहे. पुरवठादार कंपनीला यासंदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या जात असल्याचे ताडदेव आरटीओ प्रकाश जाधव यांनी सांगितले आहे.

"आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे. बऱ्याचवेळा संबंधीत अर्जदाराच्या पत्यावर आरसी स्मार्ट कार्ड न पाठवता परस्पर एजंटला दिल्या जाते. शिवाय, तात्काळ आरसी मिळवायची असल्यास पैसे दिल्यास एकाच दिवसात सुद्धा आरसी दिली जात असल्याने यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे."

- विकास पवार, मनसे वाहतूक सेना

रोसमेर्टा कंपनीने वेळोवेळी कराराचा भंग करूनही त्यांना मुदतवाढ दिली जात आहे. त्याचा फायदा घेऊन या कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी सर्रास लूट चालवली आहे.मुंबईसह उपनगरातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये आरसी स्मार्ट कार्ड प्रिंटिंग प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com