मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबईतील आरेमाधल्या कारशेडवर कारवाई केली आहे. आरेतील कारशेडला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलीये
आरेत रातोरात वृक्षतोड करण्यात आली होती. याला उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलाय. संपूर्ण आढावा घेतल्याशिवाय आरे मधील कारशेडचं पुढील काम बंद राहणार आहे. दरम्यान यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंच्या आरे कारशेड स्थागीतीवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलीये.

माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच ! या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवलाय.
मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच ! #SaveMetroSaveMumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते.
अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील. #SaveMetroSaveMumbai— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
दरम्यान महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला पाठींबा देताना पाहायला मिळतेय. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आरे कारशेडच्या निर्णयाचं समर्थन केलंय.
Webtitle : reaction of devendra fadanvis on uddhav thackerays stay on aarey car shed