
मुबई : लॉकडाऊन काळात मुंबईसह राज्यात मालमत्ता खरेदीचे व्यवहार थंडावले होते. मात्र अनलॉकिंगनंतर मालमत्ता क्षेत्र हळूहळू उसळी घेत असल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मालमत्ता/गृह खरेदीची संख्या वाढली आहे. या काळात भाडेतत्तावर मालमत्ता देण्याच्या प्रमामातही वाढ झाली आहे. एकट्या मुंबईत ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मालमत्ता खरेदीत 112 टक्क्याने वाढ झाली आहे. या महिन्यात जवळपास 5, 597 घर खरेदीची नोंद झाली आहे. तर ऑगस्ट महिन्यात केवळ 2,642 मालमत्ता विक्रीची शासनदरबारी नोंद झाली होती. मुद्रांक शुल्कात केलेली कपात हे या मागील प्रमुख कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
मुंबईत गेल्या महिन्याभरापासून घरांच्या खरेदीत वाढ झाली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात घर विक्रीचे एकुण 4,032 करारपत्र झाले. गेल्या सप्टेंबर महिन्याची तुलना केल्यास 39 टक्क्याने वाढ झाली आहे. या सप्टेंबर महिन्यात राज्यात एकुण 1,19,834 मालमत्ता विकल्या केल्या, ऑगस्टच्या तुलनेत घरांच्या विक्रीमध्ये 46 टक्के एवढी वाढ नोंदवली गेली आहे.
या काळात राज्य सरकारने सप्टेंबर ते 31 डिसेंबर महिन्यात घर खरेदी विक्रीच्या व्यवहारावर लागणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये 3 टक्के कपात केली. जानेवारी 2021 ते मार्च 2021 या काळात खऱेदी व्यवहारात मुद्रांक शुल्क 2 टक्क्याने कमी केलं. या निर्णयामुळे मालमत्ता बाजारामध्ये उस्ताहाचं वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान अनेक बांधकाम व्यावसायिकांनी शुन्य मुद्रांक शुल्कावर घर खरेदी कऱण्याच्या ऑफर दिल्या. त्यामुळे अनेक ग्राहकांनी घर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे या व्यवसायातील जाणकारांनी सांगीतले.
मुद्रांक शुल्क कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा योग्य तो परिणाम होत असल्याचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलय. याचा फायदा ग्राहकांना मिळतोय. त्यामुळे 25 ऑगस्ट महिन्यापासून मालमत्ता खरेदी करणाऱ्याची संख्या वाढली आहे. यामध्ये अधिक वाढ होई अशी आशा असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगीतले.
देशामध्ये मुंबई शहरातील मालमत्तेचे दर सर्वाधिक आहेत. मुद्रांक शुल्कात कपात झाल्याने सरकारी तिजोरीवर 1 हजार कोटी रुपयाला बोझा पडला. मात्र सप्टेंबर महिन्यात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क मिळून सरकारी तिजोरीत 181 कोटी रुपये जमा झाले. गेल्या सप्टेबरमध्ये 348 कोटी रुपये उत्पन्न झाले होते. मा लॉकडाऊन नंतर जून महिन्यात गृह खरेदीमध्ये थोडी तेजी यायला लागली. जुलै महिन्यात घर खरेदी करण्याऱ्याची संख्या थोडी वाढायला लागली. सप्टेंबर महिन्यात मुंबईत 2,398 आणि तर राज्यात 29,250 घर खरेदीचे करार झाले. ऑगस्टमध्ये मुबईत 2,359 तर राज्यात 23,353 गृह खरेदीचे करार झाले होते.
मुंबईत सप्टेबर महिन्यात भाडेकरारवर दिल्या जाणाऱ्या मालमत्तेतही वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 2,515 अधिक घरे भाडेकरारावर देण्यात आलेत. सप्टेंबर महिन्यात एकुण 19,216 मालमत्ता भाडेतत्वावर दिल्या गेल्या. यामध्ये 17,216 ई रजिस्ट्रेशन तर 2,394 कार्यालयात नोंदणी करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात ही संख्या केवळ 16,095 एवढी होती.
कोरोनामुळे लोकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अनेकांनी नोकऱ्या गमावल्यात तर अनेकांचे पगार कमी झालेत. त्यामुळे मालमत्ता खरेदीमधील ही तेजी अल्पकालीन ठरु शकते असा इशारा अनेक बांधकाम व्यवसायिकांनी दिला आहे.
( संकलन - सुमित बागुल )
real estate sector of mumbai coming back on track after corona lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.