मुख्यमंत्रीसाहेब हे पाहतायत ना ? साध्या सर्दी खोकल्यासाठी पण आता कस्तुरबात जायचं का ?

मुख्यमंत्रीसाहेब हे पाहतायत ना ? साध्या सर्दी खोकल्यासाठी पण आता कस्तुरबात जायचं का ?

मुंबई : डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवण्याचे सरकारचे स्पष्ट निर्देश असतानाही शहरातील किंबहुना उपनगरातील बहुतांश दवाखाने बंद ठेवण्यात आल्याने सामान्य आजाराच्या उपचारासाठी आम्ही जायचे कुठे ? असा सवाल नागरिक करत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे.

सामान्य माणसाच्या सेवेसाठी काही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डॉक्टर हे अत्यावश्यक सेवेत असताना उनगरातील बहुतांश डॉक्टरांनी कोरोना सारख्या आजाराला घाबरून आपली दवाखाने बंद ठेवल्याचे दिसत आहेत. या बातमीसाठी  फोटोवरून  कल्पना येईलच. 

मुंबईतही रहिवासी अभिषेक घाग म्हणतात,  गेल्या काही दिवसांपासून दवाखाने बंद आहेत. डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावे असे सरकारचे निर्देश आहेत. मात्र डॉक्टरांनी दवाखान्याला कुलूप लावून ठेवले आहे. साध्या सर्दी खोकला , ताप, पडसं यावर उपचार घेण्यासाठी आम्ही  जायचं तरी कुठे?  

घाटकोपरच्या इंदिरानगर, साईनाथ नगर येथील दवाखाने बंद ठेवण्यात आली आहेत . इंदिरानगर, आनंदनगर, साईनाथ नगर, रामनगर हा झोपडपट्टी विभाग असून येथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. साध्या ताप, सर्दी, खोकला असल्यास नागरिकांनी उपचारासाठी जायचे कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे . 

reality chechk during lockdown this is situation of various clinics of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com