
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील अंबरनाथ-बदलापूर दरम्यान चिखलोली हे नवे स्थानक उभारण्यास रेल्वे मंडळाकडून परवानगी देण्यात आली आहे. या स्थानकाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील स्थानक "चिखलोली' ही उद्घोषणा प्रवाशांना लवकरच ऐकायला मिळेल.
अंबरनाथ-बदलापूर दरम्यान चिखलोली स्थानक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. यासंदर्भात रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. नुकताच हा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. स्थानकाच्या उभारणीसाठी एकूण 8.50 एकर जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. भूसंपादन झाल्यानंतर स्थानक उभारणीचे काम सुरू होईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चिखलोली स्थानकामुळे अंबरनाथ-बदलापूर स्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन करण्यास मदत होईल. यासह अंबरनाथ, बदलापूरमधील वाढत्या शहरीकरणाचा फुगवटा चिखलोली दरम्यान पसरला जाईल, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी महासंघाचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.
Recognition of new Chikhloli station on Central Railway Land Acquisition process begin
-------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.