
Sandalwood Smuggling: मुंबईत लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीच्या योजनांना धक्का बसला आहे. पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाने मोठ्या कारवाईत 93 किलो लाल चंदन जप्त केले आहे. तस्करांनी जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस (12956) च्या भाडेतत्त्वावरील पार्सल व्हॅनमधून चंदन वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सतर्क रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांच्या डावपेचांचा भांडाफोड केला.