सावधान, पुढे लाल सिग्नल आहे!

संतोष मोरे
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - सावधान... पुढे लाल सिग्नल आहे, अशी उद्‌घोषणा लवकरच मोटरमनच्या केबिनमध्ये ऐकू येईल. काही दिवसांत सिग्नल तोडून लोकल पुढे गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, अशा घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने नवी प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.  

लोकलचा सिग्नल लाल असतानाही तो ओलांडून प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घटना टाळाव्यात म्हणून पुढे सिग्नल आहे, अशी माहिती देणारी चेतावणीपूरक प्रणाली लोकलच्या मोटरमनच्या डब्यात लावली जाणार आहे. पूर्वसूचनेनंतरही मोटरमनने लक्ष न दिल्यास अत्यावश्‍यक ब्रेक लावला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई लोकल दर चार ते पाच मिनिटांच्या अंतरांनी धावतात. त्या दरम्यान सिग्नल तोडल्यास अपघाताची शक्‍यता असते. लोकलने पिवळा सिग्नल पार केल्यास सिग्नल सतर्कता प्रणाली आवाज करून लाईटने मोटरमनला सतर्क करील. या प्रणालीवर काम सुरू असून महिन्याभरात लोकल ही प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे सिग्नल ओलांडण्याच्या घटना कमी होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक संजय कुमार पंकज यांनी दिली.

सिग्नल तोडल्याच्या आठ वर्षांत 88 घटना 
मे महिन्यातील घटना 
११ मे - कसारा-सीएसएमटी लोकल 
१४ मे - सीएसएमटी-बेलापूर लोकल 
१८ मे - सीएसएमटी-टिटवाळा लोकल

कशी असेल यंत्रणा 
सिग्नल सतर्कता प्रणालीत अलार्म व दक्षता बटण आहे. इंडिकेटरवर लाल, हिरवा आणि निळा रंग दर्शवणारे दिवे आहेत. जर अलार्म बटण बंद झाले तर मोटरमनला चार सेकंदात सतर्कता बटण दाबणे आवश्‍यक आहे अन्यथा ब्रेक कार्यान्वित होईल व गाडी थांबवल्याशिवाय ते सुरू होणार नाही.

Web Title: red signal alert local