esakal | BMC मुंबई लोकल सेवेबाबत गुरुवारपर्यंत घेणार निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

local train

BMC मुंबई लोकल सेवेबाबत गुरुवारपर्यंत घेणार निर्णय

sakal_logo
By
सुमित सावंत

मुंबई: मुंबईचा पॉझिटिव्हिटी (Mumbai positivity rate) रेट चार टक्क्यांपेक्षा खाली असून राज्य सरकारने जे निकष ठरवलेत, त्यानुसार मुंबई लेव्हल १ मध्ये आहे. पण मुंबई महापालिकेने (bmc) मुंबईला अजून लेव्हल ३ मध्येच ठेवले आहे. त्यामुळे लेव्हल १ मध्ये येऊनही मुंबईत निर्बंध कायम आहेत. लेव्हल १ म्हणजे अनलॉक (unlock) ज्यात सार्वजनिक वाहतुकीपासून सगळ्या गोष्टी पूर्णपणे सुरळीत सुरु होतात. मागच्या काही दिवसांपासून मुंबईकरांचे लक्ष लोकलच्या निर्णयाकडे लागले आहे. (Regarding mumbai local service bmc will take decision very soon mumbai mayor kishori pednekar)

लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटले जाते. कोरोना काळ सुरु होण्याआधी मागच्यावर्षी मुंबई लोकलमधून दररोज दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करायचे. पण कोरोनाची साथ आल्यानंतर लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली. मागच्यावर्षी ऑक्टोबरपासून आधी महिला, त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु झाली. पण दुसरी लाट आल्यानंतर एप्रिलपासून लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहे.

हेही वाचा: देव तारी त्याला... अख्खी ट्रेन वरून गेली पण बचावली महिला!

आता मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दररोजची रुग्णवाढ काहीशेच्या घरात आहे. त्यामुळे मुंबई लोकल कधी सुरु होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लोकल प्रवासामुळे कोरोनाचा फैलाव होईल, या भीतीपोटी अजूनही लोकल सुरु झालेली नाही.

हेही वाचा: महाविकास आघाडीला झटका, BMC निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

दुसऱ्या लाटेच्या प्रसारासाठीही मुंबई लोकलला जबाबदार धरण्यात आले होते. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. लोकल सुरु झाली, तर खऱ्या अर्थाने मुंबई पूर्णपणे अनलॉक झाली, असे म्हणता येईल. आता या लोकल प्रवासाबाबत मुंबईच्या महापौरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 'लोकल प्रवासाबाबत मुंबई महापालिका गुरुवारपर्यंत निर्णय घेईल' असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

loading image
go to top