Relianceची आता HUL, नेस्ले, ब्रिटानियासोबत स्पर्धा! 'या' नव्या बिझनेसची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

reliance retail_Isha Ambani

Relianceची आता HUL, नेस्ले, ब्रिटानियासोबत स्पर्धा! 'या' नव्या बिझनेसची घोषणा

नवी दिल्ली : रिलायन्स रिटेल आता हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड, नेस्ले आणि ब्रिटानियासारख्या कंपन्यांसोबत स्पर्धा करणार आहे. कारण रिलायन्स कंपनी या वर्षभरात फास्ट मुविंग कॉन्सुझमर गुड्सच्या (FMCG) व्यवसाय सुरुवात करणार आहे. कंपनीच्या संचालिका ईशा मुकेश अंबानी आजच्या सर्वसाधारण सभेत याची घोषणा केली. (Reliance to launch FMCG business this year: Isha Ambani at AGM)

सोमवारी रिलायन्सची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत बोलताना ईशा अंबानी म्हणाल्या, मला याची घोषणा करताना याचा आनंद होतोय की रिलायन्स रिटेल याच वर्षी FMCG बिझनेसमध्ये पाऊल ठेवणार आहे. या व्यवसायाचा हेतू प्रत्येक भारतीयाच्या रोजच्या गरजा पूर्ण करणं तसेच चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट डिलिव्हर करणं हा आहे.

हेही वाचा: परवानगी मिळो अथवा नाही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार - उद्धव ठाकरे

या बिझनेस सेगमेंटमुळं रिलायन्स रिटेलची स्पर्धा थेट FMCG कंपनी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड, नेस्ले आणि ब्रिटानिया या कंपन्यांसोबत होणार आहे. याशिवाय ईशा अंबानी यांनी सांगितलं की, रिलायन्सनं टाकलेल्या या पावलामुळं लोकांना केवळ रोजगार उपलब्ध होणार नाही तर आंत्रप्रन्योरशिपमध्ये देखील येण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर भारतीय कामगारांना विशेषतः महिला कामगारांची क्षमता, कौशल्य आणि ज्ञान राखून ठेवण्यास मदत मिळेल.

Web Title: Reliance To Launch Fmcg Business This Year Isha Ambani At Agm

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..