नवलखा यांना तात्पुरता दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 November 2019

मुंबई : शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला. त्यांना २ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.

या प्रकरणात अटक होण्याच्या शक्‍यतेमुळे त्यांनी जामीन अर्ज केले आहेत. या दोन्ही अर्जांवर २ डिसेंबरला एकत्रित सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने निश्‍चित केले. त्यामुळे तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असे निर्देश न्या. प्रकाश नाईक यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत.

 नवलखा यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. नवलखा यांना १२ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे नवलखा यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी, असा युक्तिवाद करत सरकारने त्यांना जामीन देण्यास विरोध केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief again to Navlakha