मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक:  हार्बर रेल्वे मार्गावरील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा

प्रशांत कांबळे
Saturday, 5 September 2020

मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मुख्य मार्गांवर रविवारी (ता. 6) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मुख्य मार्गांवर रविवारी (ता. 6) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा जम्बो ब्लॉकची घोषणा केली असून, हार्बर मार्गावर यावेळी मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरिल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही; कोण देतंय कंगनाला संरक्षण? वाचा

कुठे
मुख्य मार्गांवरील  माटुंगा-मुलुंड अप व डाउन जलद मार्गांवर 

कधी 
सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेंपर्यंत 

परिणाम
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत सुटणा-या डाउन जलद विशेष सेवा निर्धारित थांब्यावर थांबत माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यानंतर मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील आणि संबंधित गाड्यांच्या  वेळापत्रकांनुसार थांबविण्यात येणार आहेत. तसेच सकाळी  9.28 ते दुपारी 2.26 मिनिटांनी या वेळेत ठाणे येथून सुटणार्‍या जलद विशेष सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार आहे.

दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक

कुठे 
संताक्रूज ते माहीम रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी
सकाळी 10.35 ते 3.35 वाजेपर्यंत
परिणाम
लॉक दरम्यान सर्व उपनगरीय सेवा सांताक्रूज तथा माहीम रेल्वे स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief to emergency service staff on the megablock harbor railway line on Sunday on the Central, Western Railway