esakal | रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती आता मिळणार फक्त एका कॉलवर
sakal

बोलून बातमी शोधा

रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती आता मिळणार फक्त एका कॉलवर

कोरोनावर दिलासादायक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती आता मिळणार फक्त एका कॉलवर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोनावर दिलासादायक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे, आता रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती एका कॉलवर उपलब्ध होणार आहे.

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांकावरही संपर्क साधून रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरव विजय एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे, दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज आणि उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी आणि  वितरक उपस्थित होते.

30 सप्टेंबरपर्यंत आणखी इंजेक्शन उपलब्ध होणार

या बैठकीमध्ये इंजेक्शनचा तुटवडा होऊ नये यासाठी महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा जास्तीत जास्त साठा उपलब्ध करावा, दुर्गम भागामध्ये रुग्णांसाठी सहज औषधे उपलब्ध होतील, त्या दृष्टीकोनातून वितरण व्यवस्था राबवण्यात यावी, असे निर्देश शिंगणे यांनी उत्पादक कंपन्यांना दिले. त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शन कुठे किती प्रमाणात उपलब्ध आहे, त्याची किंमत किती आहे, याची माहिती रुग्णांना आणि नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी हेल्पलाईन क्रमांक किंवा पोर्टल सुरु करण्याचे निर्देश शिंणगे यांनी प्रशासनाला दिले. हेल्पलाईन सुरु झाल्यावर रुग्णांना इंजेक्शन माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्यामध्ये सध्या 15,779 इंजेक्शन उपलब्ध असून 30 सप्टेंबरपर्यंत सुमारे 1,50,256 इंजेक्शन उपलब्ध होतील अशी माहिती यावेळी उत्पादक आणि त्यांच्या वितरकांनी दिली.

रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी एफडीएच्या मुंबईतील मुख्यालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कार्यरत नियंत्रण कक्षामधून रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर मागणी आणि त्याची पूर्ततेसंदर्भातील माहिती आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध होणार आहे. सध्या प्रत्येक कोविड संशयित आणि कोविडग्रस्त रुग्णांस सुरवातीपासून रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येत असल्याने त्याची मागणी भरपूर वाढली आहे.  आरोग्य विभागाने टास्कफोर्समार्फत प्राटोकॉलप्रमाणे उपचार करताना रुग्णाची स्थिती बघूनच आवश्यक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करण्याचे निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना दिल्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही आणि गरजू रुग्णांना ते उपलब्ध होतील या हेतुने परिपत्रक जारी करण्याबाबत आरोग्य विभागास कळवण्यात यावे, अशा ही सूचना उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या. 

ऑक्सिजन टँकरची संख्या वाढवणार

रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा वापर सुध्दा वाढला आहे आणि दुर्गम भागातील काही जिल्हातील रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा बाबत आणि अनियमित पुरवठा बाबत तक्रारी येत आहेत. याकडे लक्ष वेधून उत्पादक आणि पुरवठादार यांनी दुर्गम भागातील रुग्णालयांना सुध्दा ऑक्सिजनचा पुरवठा नियमित व्हावा यासाठी टँकरची संख्या वाढविण्यात यावी आणि नियंत्रण कक्षाकडून होणारे निर्देशनानुसार पुरवठा करावा असे निर्देश अन्न व औषध विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंणगे यांनी दिले.

----------

(संपादनः पूजा विचारे) 

Remedesivir injection information now be available just one call