esakal | कल्याणमध्ये आलिशान 'रॉल्स रॉयस'ची जोरदार चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये आलिशान 'रॉल्स रॉयस'ची जोरदार चर्चा

आठ कोटींची गाडी पाहण्यासाठी कल्याणचे नागरिक आतूर

कल्याणमध्ये आलिशान 'रॉल्स रॉयस'ची जोरदार चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: जगात खूप कमी लोकांकडे असलेली महागडी सुमारे आठ कोटींहून अधिक किमतीची 'रोल्स रॉयस' कंपनीची कार कल्याण पूर्वमधील प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांनी खरेदी केली आहे. ही कार कल्याण शहरात आणल्याने तो चर्चेचा विषय बनली आहे. (Renowned Businessmen Sanjay Gaikwad bought Luxurious Rolls Royce Ghost)

हेही वाचा: म्युकरमायकोसिस: बुरशीच्या वेगवेगळ्या रंगांमुळे BMC हैराण

कल्याण पूर्वमधील गौरी विनायक बिल्डर्सचे मालक संजय गायकवाड हे मागील ३० वर्षांपासून उद्योजक असून, शहरात अनेक इमारती उभ्या केल्या असून, एक उद्योजक आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. २४ मे रोजी त्यांनी 'रोल्स रॉयस घोस्ट' ही कार घरी आणली. गायकवाड यांनी आठ कोटींपेक्षा जास्त किंमत मोजून ही कार कल्याण शहरात आणल्याचे समजते. भारतात लॅम्बॉर्गिनी, बुकाटी, टेस्ला, जॅग्वार अशा गाड्यांची क्रेझ तर आहेच; पण 'रोल्स रॉयस' ही कार जगभरातील सर्वात 'रॉयल' कार मानली जाते. आठ कोटींची गाडी पाहण्यासाठी कल्याणचे नागरिक आतूर आहेत.