नेरळवासीयांवरचे संकट टळले; पण कर्जतकरांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 23 एप्रिल 2020

ठाणे येथे कंपनीतूनच रुग्णालयात दाखल झालेल्या नेरळमधील तरुणाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्या तरुणाच्या कुटुंबातील चार जणांची देखील कोरोना संसर्गाची वैद्यकीय चाचणी केली. मात्र त्या सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आल्याने नेरळ गावावरील कोरोनाची टांगती तलवार दूर झाली आहे.

नेरळ : ठाणे येथे कंपनीतूनच रुग्णालयात दाखल झालेल्या नेरळमधील तरुणाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्या तरुणाच्या कुटुंबातील चार जणांची देखील कोरोना संसर्गाची वैद्यकीय चाचणी केली. मात्र त्या सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आल्याने नेरळ गावावरील कोरोनाची टांगती तलवार दूर झाली आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्या 51 लोकांना दिलासा
आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या नेरळ गाव आणि परिसरातील 51 जणांना होम क्वारंटाईन केले आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह तरुणाचे नेरळ येथील कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या 51 लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याच्या अहवालावर गावांचे भवितव्य!
कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या सोबत राहून नेरळ ते दिघा एमआयडीसी असा प्रवास करणारा त्याच्या मित्राचीही कोरोना चाचणी केली करण्यात आली आहे. नेरळ जवळील गावातील हा तरुण नेरळ जवळील एका गावात राहत असून त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनाही आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे आता त्या तरुणाच्या अहवालावर नेरळ परिसरातील गावांचे कोरोनाबाबतचे भवितव्य अवलंबून आहे.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

कर्जतसुद्धा चिंतेच्या छाय़ेत
कर्जत शहराला लागून असलेल्या गावांतील दोन तरुणांच्या कोरोना टेस्ट आरोग्य विभागाने केल्या असून त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, दोन जणांच्या कोरोना टेस्टचे अहवाल येणे बाकी असल्याने कर्जत शहरालगतचे गाव सध्या टेंशनमध्ये आले आहे.

report getting negative of neral corona patients family


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: report getting negative of neral corona patients family