वारकरी आणि कोळी बांधवांचे प्रतिनिधी राज दरबारी दाखल; अडचणी आणि मागण्यांचा वाचला पाढा

तुषार सोनवणे
Wednesday, 11 November 2020

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे अनेक संघटना आणि व्यक्तींना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धाव घेतली आहे.

मुंबई - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे अनेक संघटना आणि व्यक्तींना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धाव घेतली आहे. कोळी वाड्यासंदर्भातील मागण्या घेऊन आजही आगरी कोळी बांधवांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा - डिजिटल माध्यम माहिती, प्रसारण मंत्रालयाच्या अख्यतारीत; केंद्र सरकारचा निर्णय

कोरोना काळात अनेक संघटना आणि लोकांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. वाढीव विजबिले, मुंबईतील डबेवाले, रिक्षाचालक संघटना, विद्यार्थी पालक संघटना, रेल्वे प्रवासी संघटना, जीम मालक, केबलचालक अशा अनेकांनी आपले गऱ्हाने राज ठाकरेंकडे मांडले आहे. राज यांनी देखिल ते सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. आज देखील मुंबईतील कोळीवाड्याच्या प्रश्नावरून कोळी बांधवांनी, कार्तिकी एकादशीला पंढरपुरमधली संचारबंदी हटवली जावी यासाठी वारकऱ्यांनी तसेच मुंबई ठाण्यातील बॅंड पथकांच्या प्रतिनिधीनी राज ठाकरेंची भेट घेतली. 

हेही वाचा - 'उद्धव ठाकरे कुठे आहे आपला चमत्कार'?; नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याने भाजपकडून खिल्ली

कोळीवाडे हे मुंबईत असले तरी, ती गावेच आहेत. त्यांच्या सिमांकनाचा प्रश्न महापालिकेकडे प्रलंबित आहे. कोळीवाड्याला गावठान हक्क द्यावा अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे. कोळीवाडे बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोपही कोळी बांधवांनी यावेळी केला. कोळी बांधवांचा हा प्रश्न राज कशा पद्धतीने सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

----------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Representatives of Warkari and Koli at krushnkunj of raj thackeray