Republic Day 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

पूजा विचारे
Tuesday, 26 January 2021

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून वंदन केले.

मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून वंदन केले. मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी ध्वजास सलामी देणाऱ्या पोलिस पथकासह उपस्थित वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मुंबईतील पाच नव्या सायबर पोलिस ठाण्यांचं उदघाटन देखील झालं आहे. या पोलिस ठाण्याचं उदघाटन मुख्यमंत्र्यांनी न करता परमबीर सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईतल्या डी बी मार्ग पोलिस ठाण्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या कार्यक्रमाला मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंगही उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबईतल्या 94 पोलिस ठाण्यातील स्वागत कक्षाचेही व्हिडिओच्या माध्यमातून उदघाटन करण्यात आलं होते.

हेही वाचा- उद्या हा वणवा आणखीही पसरू शकतो, हे खरेच प्रजासत्ताक आहे का?;सेनेचा मोदींना सवाल

 Republic Day 2021 Flag hoisting hands CM Uddhav Thackeray Varsha Bungalow


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day 2021 Flag hoisting hands CM Uddhav Thackeray Varsha Bungalow