REPUBLIC DAY: आपला राष्ट्रध्वज फडकविण्याचे 'हे' नियम तुम्हाला माहिती आहेत का?

सुमित बागुल
Tuesday, 26 January 2021

या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात आपल्या अभिमानाचं प्रतीक, आपला राष्ट्र्वाध्वज वापरण्याचे काही नियम आणि कायदे. 

मुंबई : तुमच्या, माझ्या, जगभरातील प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचं प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या सर्वांच्या मनात आपल्या राष्ट्रध्वजाबाबत एक विशेष आदर हा आहेच. टीव्हीवर एखाद्या गाण्यात, सिनेमा थिएटरमध्ये सिनेमाच्या आधी राष्ट्रगीतासोबत झळकणारा राष्ट्रध्वज किंवा अगदी रस्त्यावरून जात असताना विविध चौकांमध्ये डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज कायमच आपल्याला रोमांचित करतो आपल्या देशाप्रती आपली आपुलकी ही आपसूकच व्यक्त होते. मात्र ज्याप्रकारे आपण चारचौघात आपल्या राष्ट्र्वाध्वजाबाबत बोलतो, आपल्या राष्ट्रध्वजाबाबतचा आदर व्यक्त करतो, त्याच आणि तेवढ्या प्रमाणात आपल्याला आपल्याच राष्ट्रध्वजाबातची माहिती आहे का? केवळ एक व्यक्ती म्हणून नाही, तर एक संस्था म्हणून आपण आपला राष्ट्रध्वज वापरताना आपण सर्व नियम पाळतोय का ? तर याचं उत्तर दुर्दैवाने नाही असं येईल. 

या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात आपल्या अभिमानाचं प्रतीक, आपला राष्ट्र्वाध्वज वापरण्याचे काही नियम आणि कायदे. 

सुरवात करूयात इतिहासापासून...  

 • आपण आपला राष्ट्र्वाध्वज योग्य प्रकारे वापरतो की नाही, यासाठी सुरवातीच्या काळापासून लक्ष ठेवलं जायचं. विशेषकरून राष्ट्रध्वजाच्या अयोग्य वापरास प्रतिबंध घालण्यासाठी १९५० च्या  'चिन्हे आणि नावे' म्हणजेच एम्ब्लेम अँड नेम्स ऍक्ट १९५० अंतर्गत अंतर्गत कायदा होता.  
 • यानंतर राष्ट्रीय सन्मानाला ठेच पोहोचू नये म्हणून १९७१ मध्ये 'प्रिव्हेन्शन ऑफ इंसल्ट ऑफ नॅशनल ऑनर ऍक्ट' हा कायदा आमलात आणला गेला. 
 • यानंतर २००२ मध्ये 'द फ्लॅग कोड ऑफ इंडिया' हा कायदा आणला गेला. यामाध्यमातून आपल्या राष्ट्र्वाध्वजाबाबत आणि राष्ट्र्वाध्वजाच्या वापराबाबतचे सर्व नियम एकाच कायद्याअंतर्गत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

भारताच्या राष्ट्र्वाध्वजाची संहिता ही साधारण तीन भागांमध्ये विभागली गेली आहे 

 1. भाग एक - राष्ट्र्वाध्वजाबाबतची सामान्य माहिती... 
 2. भाग दोन - राष्ट्रध्वज फडकवण्याचा खासगी स्तरावर केला वापर, तसंच सार्वजनिक, खाजगी संस्था आणि शैक्षणिक संस्थाकडून केला जाणारा राष्ट्र्वाध्वजाचा वापर 
 3. भाग तीन - राष्ट्रध्वज फडकवण्यासंबंधित केंद्रशासित प्रदेश किंवा देशातील राज्य सरकारे किंवा सरकारी संस्थांकडून होणारा वापर 

राष्ट्र्वाध्वजाबाबतची सामान्य माहिती जी आपल्या सर्वांना माहिती असायलाच हवी...  

आपल्या राष्ट्र्वाध्वजाची लांबी आणि रुंदी किती असावी ? ( आकार मिलिमीटरमध्ये )

1    6300 × 4200
2    3600 × 2400
3    2700 × 1800
4    1800 × 1200
5    1350 × 900
6    900 × 600
7    450 × 300
8    225 × 150
9    150 × 100

'हे' तर माहित असायलाच हवं... 

 • राष्ट्रध्वजावरील सर्वात वरील रंग हा भारतीय केशरी म्हणजेच केसरीया असावा तर सर्वात खालील पट्ट्यातील हा हिरवा असावा.
 • मधल्या पट्टयाचा रंग हा पांढरा असावा, या पट्ट्याच्या मध्यभागी 'नेव्ही ब्लू' रंगामध्ये २४ आरे असणारं अशोक चक्र असावं. महत्त्वाची बाब म्हणजे सर्व २४ आऱ्यांमधील अंतर सामान असायलाच हवं. 
 • २२ जुलै 1947 साली भारतीय संविधान सभेच्या बैठकीत या ध्वजाला मान्यता मिळाली. ही मान्यता मिळाल्यानंतर आपला राष्ट्र्वाध्वज अधिकृतरित्या स्वीकारला गेला. त्यानंतरही हाच ध्वज प्रजासत्ताक भारताचा राष्ट्रवध्वज म्हणून कायम ठेवला गेला. भारतात आपला राष्ट्रवध्वज हा मुख्यत्वे तिरंगा या नावाने संबोधलं जातो आणि ओळखला जातो. 

आपला राष्ट्र्वाध्वज 'स्वराज्य' या संकल्पनेवर आधारित आहे

 • महत्त्वाची बाब म्हणजे खादी किंवा हाताने तयार केलेल्या कपड्यापासून बनवलेला ध्वज वापरण्याची परवानगी असते. इतर कोणत्याही साहित्याचा ध्वज बनवण्यासाठी केलेला वापर हा दंडनीय अपराध आहे. 
 • विविध राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपण कागदी राष्ट्र्वाध्वज अनेकदा फडकावतो. त्यानंतर हे राष्ट्रवध्वज जमिनीवर टाकणे किंवा अडगळीत ठेवणे हा देखील अपराध आहे

राष्ट्रवध्वज फडकवताना योग्य नियमावलीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे

 • नियम सांगतात की, जेव्हा आपण आपला राष्ट्रध्वज एखाद्या स्टेजवर किंवा भिंतीवर फडकावतो किंवा प्रदर्शित करतो तेंव्हा आपला राष्ट्रवध्वज हा कोणतीही चुरगळी न पडत केशरी रंग वरच्या बाजूला ठेऊन फडकावला किंवा प्रदर्शित केला गेला पाहिजे 
 • आपल्या राष्ट्रवध्वजाचा वापर कधीही कोणत्याही टेबलाचा, पोडियमचा, किंवा एखाद्या रेलिंगला कव्हर करण्यासाठी करू नये. 
 • आपला राष्ट्रवध्वज हा एखाद्या हॉलच्या भिंतीवर किंवा कोणत्याही कार्यक्रमात फडकवायचा असल्यास तो कायम भिंतीवर उजव्या बाजूला आणि पाहणाऱ्याच्या डाव्या बाजूला असावा. कारण हे अधिकाराचे स्थान आहे.
 • जेव्हा हॉलमध्ये किंवा इतर सभास्थानामध्ये राष्ट्रध्वज प्रदर्शित करताना एखाद्या वक्त्याच्या उजव्या हाताला आपला राष्ट्रध्वज असावा
 • व्यासपीठाच्या मागील भिंतीवर राष्ट्रध्वज उभा फडकवायचा असल्यास राष्ट्रध्वजावरील केशरी किंवा केसरीया रंग हा पाहणाऱ्याच्या डाव्या बाजूला असावा
 • एखाद्या मिरवणुकीत किंवा राष्ट्रीय मार्चमध्ये राष्ट्रध्वज परेडमध्ये सहभागी झाला असेल तर एकतर आपला राष्ट्रवध्वज हा उजव्या कोपऱ्यात किंवा इतर सर्व ध्वजांच्या पुढे मध्यभागी एकटा असावा. 
 • ध्वज फडकविताना किंवा कोणत्याही सोहळ्यादरम्यान किंवा एखाद्या परेडमधून नेताना उपस्थित सर्वांनी 'अटेन्शन' स्थितीत ध्वजासमोर उभं राहावं.
 • अधिकृत  गणवेशात असलेल्यांची ध्वजाला सॅल्यूट करत मानवंदना द्यावी 
 • राष्ट्रगीत वाजवल्यानंतर ध्वज वंदन केले पाहिजे.

कुणाच्या वाहनांवर राष्ट्रध्वज फडकावत येतो 

 • वाहनांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा विशेषाधिकार केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि भारतीय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, परदेशात असणाऱ्या मान्यताप्राप्त प्रमुखांनाच आहे. 
 • यासोबत पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या कॅबिनेटमधील मंत्री, राज्यमंत्री,  मुख्यमंत्री आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील इतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री किंवा राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाचे उपमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे उपसभापती, राज्यांमधील विधानपरिषदांचे अध्यक्ष, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधानसभेचे अध्यक्ष, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश,  उच्च न्यायालयांचे न्यायाधीश हे सुद्धा गाड्यांवर राष्ट्रध्वजाचा वापर करू शकतात. 
 • जेव्हा परदेशी पाहुणे शासनाने पुरविलेल्या गाड्यांमधून प्रवास करतात, तेव्हा राष्ट्रध्वज गाडीच्या उजव्या बाजूस फडकवावा तर परदेशी राष्ट्रध्वज डावीकडे फडकवावा.
 • इतर ध्वजांपेक्षा राष्ट्रवध्वजाची रुंदी जास्त असावी 
 • इतर ध्वजांच्या समूहात राष्ट्रवध्वज वापरताना राष्ट्रध्वजाचा खांब इतरांपेक्षा पुढे असावा. 

कुठे आणि कधी राष्ट्रवध्वज अर्ध्यावर कधी आणतात

 • राष्ट्रीय दुखवट्यामध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावतात. मात्र याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. किती काळाकरता राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवायचा आहे हेही राष्ट्रपती ठरवतात 
 • राष्ट्रवध्वज अर्ध्यावर फडकावण्याच्या आधी पूर्ण फडकावला जातो त्यानांतर राष्ट्रध्वज हळूहळू अर्ध्यावर आणला जातो 
 • देशाचे विद्यमान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांचं देहावसान झाल्यावर संपूर्ण देशात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो 
 • देशाचे मुख्य न्यायाधीश किंवा लोकसभेचे अध्यक्ष यांचं निधन झाल्यावर दिल्लीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो 
 • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि केंद्रीय मंत्री यांचं निधन झाल्यावर दिल्लीत आणि त्यांच्या मूळ राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो 
 • राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर, मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश यांच्या निधनानंतर त्यांच्या मूळच्या राज्यात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो 

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, आणि गांधी जयंतीच्या दिवशी कुणाचं निधन झालं झेंडा अर्ध्यावर फडकावला जात नाही. त्या दिवशी केवळ निधन झालेल्या व्यक्तीच्या राहण्याच्या ठिकाणावरील राष्ट्रद्वाज अर्ध्यावर फडकावला जातो. सुरवातीला पूर्ण फडकावल्यानंतरच राष्ट्र द्वाज अर्ध्यावर फडकावला जातो.

republic day code and conducts of using tricolor indian flag as per flag code of india


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: republic day code and conducts of using tricolor indian flag as per flag code of india