मुंबई पोलिस दलाची व पोलिस आयुक्ताची बदनामी केल्याप्रकरणी रिपब्लिकच्या वार्ताहर व अँकरवर गुन्हा

मुंबई पोलिस दलाची व पोलिस आयुक्ताची बदनामी केल्याप्रकरणी रिपब्लिकच्या वार्ताहर व अँकरवर गुन्हा

मुंबई - मुंबई पोलिस दलातील इतर अधिकारी मुंबई आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात बंडाच्या पवित्र्यात असल्याची बातमी प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून रिपब्लिक टीव्हीचे वार्ताहर व अँकर तसेच अधिका-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अँकर शिवानी गुप्ता, वार्ताहर सागरीका मिश्रा, पत्रकार शावन सेन, कार्यकारी संपादक निरंजन स्वामी आणि संपादकीय कर्मचारी, तसेच न्यूजरुम प्राभारी यांच्याविरोधात पोलिस(अप्रितिची भावना चेतवणे) अधिनियम 1922 कलम  3(1) व भादंवि कलम 500(बदनामी करणे) व 34(सामायिक कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 च्या सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार हे कार्यरत असताना बिगेस्ट न्यूज टुनाईट या मथळ्याखाली रिपब्लिक टीव्हीने 22 ऑक्टोबरला एक वृत्त प्रसारित केले होते. त्यात इतर तपास अधिकारी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात बंडाच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले होते. या वृत्तामुळे मुंबई पोलिस दलाची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पोलिस आयुक्तांची बदनामी करण्यात आल्यावरून पवार यांनी याप्रकरणी तक्रार केली.

वार्तांकनात वापरलेली भाषा, करण्यात आलेले निराधार दावे पहाता प्रस्तापित राज्य सरकारविरूध्द, ज्येष्ठ पोलीस अधिका-यांविरूध्द बृहन्मुंबई पोलीस दलातील अधिकारी, अमलदार यांच्यात जाणीवपूर्वक अप्रीतीची, व्देषाची भावना निर्माण करण्याकरिता, तशी जाणीवपूर्वकअप्रीतीची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे, हे माहीत असतांना वर नमूद रिपब्लिक टीव्हीचॅनेलच्या अँकर शिवानी गुप्ता, रिपोर्टर सागरिका मित्रा, रिपोर्टर शावन सेनयांनी कोणत्याही ठोस माहीती शिवाय, निराधार पणे  वार्तांकन केल्याचे केले असून त्यामुळे  बृहन्मुंबई पोलीस दलाचीही बदनामी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे

रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीच्या चार पत्रकारांविरोधात मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. हे धक्कादायक आहे.आर्टीकल 19(1) अंतर्गत हा मीडियाच्या हक्कांवरील हल्ला आहे. आम्ही प्रत्येक दबावतंत्राविरोधात समर्थपणे लढू. यापूर्वी कोणत्याही मीडियाच्या सर्व कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. चुकीच्या गोष्टींना उजेडात आणल्याबाबत पत्रकारांना टार्गेट करण्यात आले आहे. पत्रकारांवर त्यांचा बातमीचा स्त्रोत सांगण्यासाठी दबाव टाकला जातोय.

रिपब्लिक टीव्ही

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com