रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

https://www.esakal.com/desh/us-election-2020-kamala-harris-ancestral-village-tamil-nadu-prays-her-victory-367735गोस्वामी यांना अलिबागला नेले जात असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई- रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबागला नेले जात असल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांकडे कोणतीही न्यायालयाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिकने केला आहे. याशिवाय गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.

मे 2018 रोजी वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णव गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आले होते. सुसाईड नोटमध्ये पत्रकार गोस्वामी यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.  

हेही वाचा- US Election: कमला हॅरिस यांच्या विजयासाठी तमिळनाडूतील गावी पूजा

अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी हा आरोप केला होता. अर्णव गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, भाजपचे अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारने ही जाणूनबुजून कारवाई केल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic TV Editor Arnab Goswami detain by panvel police