esakal | उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वरळीकरांचं खुलं पत्र....
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वरळीकरांचं खुलं पत्र....

परिस्थिती सुरळीत करण्याचा थोडा-थोडका प्रयत्न होतो, परंतु तो पुरेसा नाही. प्रशासनाकडून कुठल्याही क्लिअर सुचना वरळीकरांना दिल्या जात नाही. हा कर्फ्यु किती दिवासाचा आहे, तो किती दिवस चालणार आहे त्यामुळे वरळीकर प्रचंड नाराज आणि संप्तप आहेत. 

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वरळीकरांचं खुलं पत्र....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

प्रति,  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  
माननीय अदित्य ठाकरे, 
मनसे प्रमुख्य राज ठाकरे,  

वरळी कोळीवाड्याच कुणी वाली आहे का? आम्हाला वाऱ्यावर सोडू नका, समस्त वरळीकरांकडून खुल पत्र. 

वरळी कोळीवाड्यात सध्या कर्फ्युमुळे अत्यावश्यक सेवा बंद आहेत. त्यात किराणा माल, दवाखाने, मेडीकल स्टोअर्स आणि दूध या सेवांचा यामध्ये समावेश आहे. लहान मुलांना दूध नाही, पेशटंना दाखवायला दवाखाने नाहीत, रुग्णांना गोळ्या नाहीत. लोकांच्या घरात खायला अन्न नाही, पैसे आहेत पण किराणा मालाची दुकान बंद असल्यामुळे गोष्टी खरेदी करता येत नाही. कोळीवाड्यातील कोळी लोकांचा व्यवसाय पूर्णपणे मासेमारी अंबलबून असतो. त्याला देखील मोठा फटका बसला आहे. 

मोठी बातमी - मुंबई पुण्यात लॉकडाऊन कालावधी वाढणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...

परिस्थिती सुरळीत करण्याचा थोडा-थोडका प्रयत्न होतो, परंतु तो पुरेसा नाही. प्रशासनाकडून कुठल्याही क्लिअर सुचना वरळीकरांना दिल्या जात नाही. हा कर्फ्यु किती दिवासाचा आहे, तो किती दिवस चालणार आहे त्यामुळे वरळीकर प्रचंड नाराज आणि संप्तप आहेत. 

वरळी कोळीवाड्यात नागरिक प्रशासनाला सहाकार्य करत आहेत. परंतु आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. आम्हाला विश्वासात घेऊन प्रशासनाने गोष्टी कराव्यात की ही आमची विनंती आहे.  

मोठी बातमी - महाराष्ट्रातील पहिलंच शहर जिथं भाजी मार्केट्स बंद, आयुक्तांनी घेतला तडकाफडकी निर्णय

आम्हा वरळीकरांना वाऱ्यावर सोडू नका, आमचं पोट आमच्या धंद्यावर आहे. आम्ही धंदा लावत नसल्यामुळे आमच्याकडे दररोज खर्चासाठीही पैसैही नाहीत. या प्रश्नी सर्व ठाकरे परिवारांनी लक्ष घालून हा वरळीकरांचा प्रश्न सोडवाव ही विनंती. मुंबईच्या मुळ माणसासोबत अन्याय होत आहे. त्यांच्यावर तोडगा काढवा सर.

धन्यवाद,  
समस्त वरळी कोळीवाडा नागरिक

resident of mumbais worli writes letter to uddhav aaditya and raj thakeray

loading image