Mumbai : माहुल मधील एमएमआरडीए वसाहतीत रहिवाशांचा जीव टांगणीला

प्रदूषणामुळे जगावे की मरावे असा प्रश्न त्यांच्या डोळ्या समोर उभा राहिला
Residents of MMRDA colony in Mahul danger health pollution chembur
Residents of MMRDA colony in Mahul danger health pollution chembursakal

चेंबूर : घातक रसायन कंपनी, डम्पिंग ग्राउंड व अस्वछता या समस्या मुळे एमएमआरडीए वसाहतील मधील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रदूषणामुळे जगावे की मरावे असा प्रश्न त्यांच्या डोळ्या समोर उभा राहिला आहे.

वाशीनाका, माहुल गावात, टाटा पॉवर, बीपीसीएल, एचपीसीएल सारखा रिफायनरी कंपन्या आहेत. यातून सतत विषारी वायू हवेत मिसळत असल्यामुळे रहिवाशांना श्वसन विकार, दमा, केस गळणे, पोट दुखणे, त्वचा काळी पडणे, फंगल, डोळ्याची जळजळ होणे इत्यादी आजाराला बळी पडावे लागत आहे. चेंबूर, माहुल गाव, वाशीनाका,गव्हाण पाडा प्रमाणे ट्रॉम्बे, मानखुर्द, महाराष्ट्र नगर परिसरातील रहिवाशांना ही याची मोठी झळ पोचत आहे.

माहुल गांव जवळील परिसरात एमएमआरडीएने प्रकल्प बाधित रहिवाशांकरिता एकूण 72 इमारती बांधल्या आहेत. त्यातील एकूण 44 इमारती अर्धवट भरलेल्या आहेत तर 4 ते 5 इमारती पूर्ण भरलेल्या आहेत. आज या इमारतीत एकूण 500 पेक्षा अधिक कुटुंब राहत आहेत. कुर्ला तानसा पाईप लाईन, रस्ता रुंदीकरण प्रकल्प बाधित लोकांचे पुनर्वसन एमएमआरडीए इमारतीत करण्यात आले आहेत.

एमएमआरडीए वसाहती मध्ये रहात आलेल्या रहीवाशांची या विळख्यातून सुटका व्हावी या करिता कित्येकदा पालिका व मंत्रालयावर मोर्चे काढण्यात आले आहे. माहुलमध्ये प्रदूषण असल्याने या परिसरात रहाणाऱ्या लोकांचे भविष्य आणि आयुष्य सुरक्षित नाही हे न्यायालयाने मान्य केले. याबाबत न्यायालयात सुनावणी लवकरच होणार आहे.

आज ही येथील रहिवाशी शाळा, रुग्णालय, पाणी, वीज या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. बीपीसीएल कंपनीत हायड्रोजन प्लांटला आग लागल्याने येथील इमारतींमधील खिडक्यांना गेलेले तडे , इमारतींना पडलेल्या भेगा, विषारी वायू, भरमसाठ प्रदूषण, रस्त्यांवर सांडपाणी, दुर्गंधी, दूषित पाणी कचरा, मातीचे ढिगारे, वायु प्रदूषण, धूळ, कमी सूर्यप्रकाश या मुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आली आहे.

या परिसरात रहायला आल्यावर दमा सुरू झाला आहे. सतत त्रास होत आहे. औषधे घेऊन ही दमा बरा होत नाही.

- फुलवती कनोजिया

त्वचा काळी पडली आहे. सतत डाग पडतात. डोक्यावरील केस गळत आहेत. अधून मधून दमा लागतो. रात्री झोप येत नाही. सतत भीती वाटते.

- जया मोरे

या परिसरातील दूषित वातावरण, अस्वछता या मुळे, उपचाराकरिता येणारा खर्च यामुळे जगावे की मरावे असा प्रश्न पडला आहे. एमएमआरडीए व पालिकेने आम्हाला बळजबरीने घरे दिली आहेत. ना रुग्णालय, ना शाळा , पोलीस चौकी या पासून वंचित ठेवले आहे.

- अनिल व्होवाल ( समाज सेवक )

अनिल व्होवाल ( समाज सेवक )दोन तीन महिन्यापासून 20 ते 40 टक्के दम्याच्या रुग्णात अधिक वाढ झाली आहे. प्रदूषण व वातावरणात झालेला बदल याचा परिणाम लोकांच्या शरीरावर होत आहे. औषधे वेळेवर घेणे थोडे बरे वाटले की रुग्ण औषधे घेत नाही. कोणीही उपचार करायचे अर्धवट सोडू नये. शरीराच्या कोणत्याही भाग असो काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉकटर यांचा सल्ला घेणे . व गर्दी च्या ठिकाणी मास्क लावणे, वाफ घेणे महत्वाचे आहे.

- डॉ . अनिल काटे - अस्थमा व चेस्ट स्पेशालिस्ट- झेन रुग्णालय - चेंबूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com