स्थलांतरीत कामगार पुन्हा मुंबईकडे परतण्यास उत्सुक!

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 29 जून 2020

अवघ्या दीड दोन महिन्यांपूर्वी मुंबईतून जाण्यासाठी स्थलांतरीत मजूर गर्दी करीत होते, पण आता मुंबईत परतण्यासाठी हेच मजूर आतूर आहेत.

 

मुंबई ः अवघ्या दीड दोन महिन्यांपूर्वी मुंबईतून जाण्यासाठी स्थलांतरीत मजूर गर्दी करीत होते, पण आता मुंबईत परतण्यासाठी हेच मजूर आतूर आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधून मुंबईकडे येणाऱ्या अकरापैकी आठ ट्रेनचे 30 जूनपर्यंतचे एकही तिकीट आता उपलब्ध नाही. स्थलांतरीत मजूर मुंबईत परतण्याचा वेग चांगलाच वाढला आहे.

संतप्त मूर्तिकार आंदोलनाच्या पवित्र्यात, मंडप परवानगीसाठी सरकारकडून अजूनही निर्देश नाही..

मुंबईत 26 ते 30 जून येणाऱ्या आठ ट्रेनची सर्व तिकीटे संपली आहेत. श्रमिक स्पेशलने महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी दहा लाख मजूरांनी नोंदणी केली होती. त्यातील सात लाख ट्रेनने गेले, तर दोन लाखांनी अन्य मार्गाचा वापप केला. कोरोना स्पेशल ट्रेन सुरु झाल्या, त्यावेळी मुंबईबाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत परतणारे प्रवासी खूपच कमी होते, पण काही दिवसात क्षमतेच्या 70 टक्केने या ट्रेन येण्यास सुरुवात झाली, तर आता शंभर टक्के क्षमतेने परतणार आहेत. 

पश्चिम रेल्वेवरुन उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमध्ये एकंदर आठ ठिकाणी ट्रेन जातात, तर मध्य रेल्वेवरुन पंधरा ट्रेन सुरु आहेत. आत्तापर्यंत बिहार, पश्चिम बंगाल आणि बिहारमधून अडीच लाख स्थलांतरीत परतले असल्याचे सांगितले जात आहे. आता रोज किमान पंधरा हजार स्थलांतरीत परत आहेत, असे सरकारी यंत्रणेतून सांगण्यात आले. मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या आधिकाऱ्यांनी सातशे स्थलांतरीत मजूर परतले आहेत. जुलैत त्यात खूप वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.  

पुनःश्च हरिओम.. मुंबईकरांनो, दोन किलोमीटरपुढे जाऊ नका; वाचा कोणी केलंय आवाहन

महाराष्ट्रात उद्योग टप्प्याटप्प्यांनी सुरु होणार हे समजल्यामुळे कामगारांनी परतण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मुंबईबाहेर पडण्यापेक्षा मुंबईत परतने सोपे आहे. त्याचबरोबर आमची कंपनी आता लवकरच सुरु होणार आहे. आमच्या साहेबांनीच फोन करुन बोलावले होते, असे मुंबई तसेच परिसरात परतलेले स्थलांतरीत सांगत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: return of migrants 8 of 11 trains to mumbai from up bihar full till june30