Revas-Reddi Coastal Highway latest update
esakal
अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामात रायगड जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पुलांचा समावेश आहे. या पुलांचे काम वेगात सुरू असले तरी, या पुलांना जोडरस्त्याच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागलेले (Revas Reddi Coastal Highway Raigad Project) नाही. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांत या रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.