Rice News : जोरदार पावसामुळे भातपिकांना दिली नवसंजीवनी !

Rice News :
farmer Speed ​​up rice pre cleaning work in Igatpuri nashik agricultural news
farmer Speed ​​up rice pre cleaning work in Igatpuri nashik agricultural newsesakal

Rice News : उरण परिसरात बरीच शेती खाडी व डोंगरालगत आहे पूर्व विभागात पावसाळी शेती झाल्यानंतर बागायती शेती करतात यामध्ये वाल तूर पावटे असे कडधान्य पिकवले जाते याशिवाय भाजीची पिकेही घेतली जातात.महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर गुरुवारी पहाटे पासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे पावसा अभावी कोमेजून, करपून जाणाऱ्या भात पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.एकंदरीत कमी अधिक पडणाऱ्या पावसाने उरण तालुक्यातील काही अंशी भात शेतीला नवसंजीवनी मिळाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.

उरण तालुका हा डोंगर कुशीत - खाडीकिनारी वसलेला तालुका आहे.या तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे आपल्या शेतजमीनीत पावसाळ्यात भाताचे पीक घेत आहेत.मात्र जुलै महिन्यात भात रोपांची लागवड झाल्यानंतर आँगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने लागवडी खाली आलेली भाताची रोपे ही पावसा अभावी कोमेजून करपून जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला.

farmer Speed ​​up rice pre cleaning work in Igatpuri nashik agricultural news
Rice Exports: निर्यातबंदी असतानाही भारत 'या' देशात पाठवणार तांदूळ, मोदी सरकारने सांगितले कारण

मात्र दहीहंडी उत्सवातच गुरुवारी पहाटेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात शेतीला दिलासा मिळाला आहे.एकंदरीत कोमेजून करपून चाललेल्या भात पिकांना नवसंजीवनी ठरणारा पाऊस झाला असल्याची चर्चा सध्या गावा गावातील चावडीवर बसून शेतकऱ्यांमध्ये केली जात आहे. तिसऱ्यांदा केलेली पेरणी दडी मारलेल्या पावसामुळे फुकट जाते की काय अशी चिंता सर्व स्तरातील शेतकऱ्यांना सतावत होती जून महिन्यात उशिरा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी जो भात पेरला होता तो भात कबुतरांच्या माध्यमातून खाल्ला गेला त्यानंतर दुसऱ्यांदा मुसळधार पावसामुळे ही शेती कुजली होती.

तिसऱ्यांदा ही पिके रो टाकून (मोड आणून)टाकून लावण्यात आली मात्र काही दिवसातच पिके थोडी वर आल्यानंतर पावसाने१५ ते २० दिवस चांगलीच दडी मारली त्यामुळे आता तिसऱ्यांदा लावलेली भात शेती ही वाया जाते की काय याची चिंता उरण परिसरातील बळीराजाला सतावत होती मात्र गुरुवारी सुरू झालेल्या पावसामुळे ही पिके पुन्हा तग धरून उभी राहिली आहेत. मुसळधार न पडता रिमझिम करणारा पाऊस असाच सुरू राहिला तर भात शेती जोमाने येण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

farmer Speed ​​up rice pre cleaning work in Igatpuri nashik agricultural news
Chinese Fried Rice : उरलेल्या भातापासून बनवा चटपटीत टेस्टी फ्राइट राइस, जाणून घ्या सोपी रेसिपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com