
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरात झाड उन्मळून पडले. रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर हे झाड पडल्याने या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. रामदिन लोधी (वय 60) असे रिक्षा चालकाचे नाव असून गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. एमआयडीसी निवासी भागात मोठ्या प्रमाणात झाडे असून त्यांची वेळेत छाटणी व देखभाल केली जात नाही. येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामुळे झाडांच्या मुळाला धोका निर्माण झाला आहे यामुळे या घटना होत असल्याचे बोलले जात आहे.