लॉकडाऊनमुळे रिक्षा, टॅक्सी चालक अडचणीत; वाहनतळ पार्किंगही ओस

लॉकडाऊनमुळे रिक्षा, टॅक्सी चालक अडचणीत; वाहनतळ पार्किंगही ओस

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातच रेल्वेची सेवा बंद केल्यानंतर रेल्वे प्रवाशांवर अवलंबून असलेल्या रिक्षा, टॅक्सी वाहतूकदारांचे दिवाळे निघाले आहे. प्रवाशांना वेळेवर न मिळणारी रिक्षा, टॅक्सींना आता, वेळेवर प्रवासी मिळत नाही. त्यामुळे वाहन कर्जाचा बोजा असलेल्या चालकाला कर्ज भरने कठीण झाले असून, रिक्षा, टॅक्सी चालकांच्या कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुर्ला, दादर, ठाणे, चर्चगेट, मुंबई सेंट्रल अशा अनेक रेल्वे स्थानकांवर वाहनांची पार्किंग आणि अशा मोठ्या स्थानकांवरून रिक्षा, टॅक्सी चालकांचा दिवसभरातील प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय चालतो. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून रेल्वे सेवाच बंद असल्याने, अनेक रिक्षा, टॅक्सी चालकांनी प्रवासी वाहतूक बंद करून इतर व्यवसायाचा पर्याय शोधला आहे. मात्र, तरीही वाहनांच्या कर्जामुळे बँकच्या तगाद्यामुळे आर्थिक घडी विस्कटलीच आहे. 

लॉकडाऊनपूर्वी आठ तासात सुमारे 600 रूपये रिक्षा चालकांचा व्यवसाय व्हायचा मात्र, आता 200 रूपये मिळणे सुद्धा कठिण झाले आहे. शाळा, महाविद्यालय, थिएटर, रेल्वे, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या बंद आहे. तर कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाही. त्यातच बेस्टने पाच रूपयांची तिकीट केल्याने नागरिक रिक्षा प्रवास टाळून बेस्टने अधिक प्रवास करत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांवर आता उपाशी मरण्याची वेळ आली असल्याचे दादर परिसरात राहणारे आणि वांद्रे परिसरात रिक्षातून प्रवासी वाहतूक करणारे शेखर भोले यांनी सांगितले.

रिक्षा चालकांचा व्यवसायावर फारच बिकट परिस्थिती आली आहे. त्यामुळे सध्या रिक्षा चालकांना 18 रूपये मीटरप्रमाणे मिळणारे भा़डे आता 20 रूपये प्रती मिटर करावी शिवाय, राज्य शासनाच्या ओपर परमिट धोरणामुळे रस्त्यांवर रिक्षाची संख्या वाढली आहे. त्यामुळे ओपन परमिट धोरण सुद्धा परिवहन विभागाने बंद करणे गरजेचे आहे. 

 शेखर भोले, रिक्षा चालक
 
कोरोनाकाळापूर्वी रेल्वे सुरू असताना वाहन पार्किंगसाठी यायचे मात्र रेल्वे बंद असल्याने वाहन पार्किंग व्यवसाय सुद्धा ठप्प झाले आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारीच येतात, मात्र त्यामुळे आधीसारखा व्यवसाय होत नसल्याने, आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन देणे ही कठीण झाले असल्याचे नाव न लिहिण्याच्या अटीवर रेल्वे पार्किंग कंत्राटदाराने सांगितले.

रिक्षा चालकांच्या व्यवसायावर 60 टक्के परिणाम झाला आहे. रिक्षा स्टॅन्डवरील जी गाडी दोन मिनिटाने हालायची त्या गाडींना आता प्रवासीच मिळत नाही. तर रिक्षा चालकाला आता प्रवाशांची प्रतिक्षा करावी लागत आहे. शिवाय रिक्षा चालकाला सुद्धा कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीची जाणीव झाल्याने रिक्षा चालकांकडून ही कोविड-19 च्या नियमांचे काटेकोर पालन केल्या जात आहे. 

- राजेंद्र देसाई, सरचिटणीस, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना

--------------

(संपादनः पूजा विचारे)

Rickshaw taxi driver in trouble due to lockdown Parking lot empty

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com