लव्ह मॅरेज करा बिनधास्त! सज्ञान मुलीला पसंतीच्या मुलाबरोबर राहण्याचा अधिकार

सुनिता महामुणकर
Thursday, 21 January 2021

आई-वडिलांचा विरोध असलेल्या 23 वर्षीय युवतीला तिच्या पसंतीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई : आई-वडिलांचा विरोध असलेल्या 23 वर्षीय युवतीला तिच्या पसंतीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आंतरजातीय प्रेम प्रकरण असलेल्या तरुणाने मुंबई उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पसची याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीला मुलीचे आई-वडील आणि मुलगी हजर होती. याचिकादार तरुण एमबीबीएस झाला असून ठाण्याच राहतो. 

मागील पाच वर्षांपासून माझे या मुलीवर प्रेम आहे आणि आम्हाला विवाह करायचा आहे; मात्र तिच्या आई-वडिलांनी तिला घरात डांबून ठेवले आहे आणि तिचा मोबाईल काढून घेतला आहे, असे युवकाच्या वतीने सांगण्यात आले. खंडपीठाने मुलीच्या वडिलांना याबाबत विचारले. त्यावर लग्नाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर खंडपीठाने मुलीला विचारले. तिने मुलाबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्याच्याबरोबर राहण्याची इच्छा आहे, पण आई-वडिलांना मान्य नाही, अशी कबुली दिली. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

न्यायालयाने याबाबत पालकांना समजावले. मुलगी 23 वर्षांची असून सज्ञान आहे. त्यामुळे तिला तिचा निर्णय घेण्याचा हक्क आहे, यामध्ये न्यायालय आणि पालकही हस्तक्षेप करू शकत नाहीत, असे खंडपीठाने सांगितले. सज्ञान व्यक्ती स्वतःच्या मर्जीनुसार लग्नाचा आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकते, आपण तिच्या स्वातंत्र्याच्या आड येऊ शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच मुलीला न्यायालयाबाहेर जिथे जायचे असेल तिथे पोलिस संरक्षण देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. 

The right of a young girl to live with the boy of her choice mumbai high courts

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The right of a young girl to live with the boy of her choice mumbai high courts