कोरोनामुक्तीनंतर अन्य आजारांचा धोका! रक्त, ऑक्‍सिजन तपासण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

कोरोनामुक्तीनंतर अन्य आजारांचा धोका! रक्त, ऑक्‍सिजन तपासण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई : कोरोना झाल्यानंतरही 50 वर्षांच्या पुढे असणाऱ्या आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीला अधिक धोका असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपचारादरम्यान आणि त्यानंतरही रुग्णाच्या शरीरातील रक्त, ऑक्‍सिजनची पातळी कायम तपासण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, कोरोना झालेल्या 60 ते 70 टक्के रुग्णांना वेगवेगळ्या हृदयविकारांचा धोका असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत अधिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शिवाय रक्ताच्या गुठळ्यांचेही आजार होऊ शकतात. मुंबईत पालिकेच्या सायन, केईएम आणि नायर रुग्णालयांत पोस्ट कोव्हिड उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 40 टक्के आहे, तर खासगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात हे प्रमाण 12 टक्के आहे. 

नायर रुग्णालयाच्या पोस्ट कोव्हिड ओपीडीमध्ये दिवसाला जवळपास 10 ते 12 रुग्ण येतात. त्यात बऱ्याचदा 35 हून अधिक वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. या विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आणि स्थूलपणा यांसारखे आजार असणारे रुग्ण अधिक आहेत. 
- डॉ. रमेश भारमल,
अधिष्ठाता, नायर रुग्णालय 

काय त्रास होतो? 

  • - अशक्तपणा 
  • - अंगदुखी 
  • - दम लागणे 
  • - हृदयविकाराचा धोका 
  • - फुप्फुसावर ताण 
  • - श्‍वास घेताना थकवा जाणवणे 

Risk of other diseases after coronation Medical experts advise to check blood and oxygen

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com