ड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता

टीम ई सकाळ
Wednesday, 2 September 2020

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्सचा मुद्दा समोर आल्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणाचा तपास त्या दिशेने सुरू केला.

मुंबई ः  सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्सचा मुद्दा समोर आल्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणाचा तपास त्या दिशेने सुरू केला. आता या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याचे ड्रग्स कनेक्शन आढळल्यामुळे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुरुवारी त्याल चौकशीसाठी बोलाविले आहे.

'मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या प्रशासनावर वचक नाही'; मनसेच्या घणाघाती टीका

    1 सप्टेंबर रोजी एनसीबीने मुंबईतून जैद विलात्र नावाच्या व्यक्तीला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान तो बासित परिहार आणि सूर्यदीप मल्होत्रा यांच्या संपर्कात असल्याचे आढळले. हे दोन्ही लोक शौविक चक्रवर्ती यांच्या संपर्कात होते. ब्युरोला शौविकचे त्यांच्याशी झालेले संभाषण हाती लागले आहे.
    एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणात एकूण तीन जणांना अटक केली आहे. करण, अब्बास आणि जैद यांना ब्युरोने अटक केली आहे. बासित परिहार याची विचारपूस केली जात असून अद्याप त्याला अटक केली नाही. गुरूवारी एनसीबी चौकशीसाठी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना नोटीस बजावू शकते, अशी बातमी ब्युरोच्या वरिष्ठ सूत्रांकडून येत आहे.

    चौकशीत असे दिसून आले आहे की शौविक ड्रग्ज घेत असे आणि त्यांचा वापर करणाऱ्यांच्या तो संपर्कात होता.  17 मार्च 2020 रोजी शौविकने जैदचा मोबाईल नंबर सॅम्युअल मिरांडाला पाठवला आणि 5 ग्रॅम ड्रग्ससाठी 10,000 रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर सॅम्युअल मिरांडाने जैदशी पहिल्यांदा संपर्क साधला. सॅम्युअलने बासितचे नाव सांगत जैदला 3 वेळा फोन केला. बासितने सॅम्युअल औषध खरेदी करण्यास मदत केली असा अंदाज व्यक्त होत आहे.

मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा

    जैद यानी चौकशीत सांगितले की, त्याने 10 हजार रुपये घेतले आणि ड्रग्स घेण्यासाठी आलेल्या दोन लोकांना 5 ग्रॅम ड्रग्स दिली. या माहितीची खात्री करण्यासाठी तपास केला असता मोबाईल लोकेशनवरून उघडकीस आले की, जैद आणि सॅम्युअल मिरांडा 17 मार्च 2020 रोजी एकाच ठिकाणी होते.
     एनसीबी रिया चक्रवर्ती, शौविक, जया शाह, श्रुती मोदी आणि गौरव आर्य तसेच इतर ड्रग डिलर्स विरोधात चौकशी करत आहे. ईडीच्या एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत अशा लोकांविरूद्ध एनसीबीने गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान ब्युरोने असा दावा केला आहे की रिया ज्या पेडलर्सकडून ड्रग्स विकत घ्यायची तो डार्कनेटद्वारे परदेशातून ड्रग्स मागवत असे.

-------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riya Chakrabortys brother to be questioned tomorrow over drug links; Possibility to send a notice to Samuel Miranda as well