वसई-विरारमध्ये रस्ते पाण्याखाली  सखल भागांत पाणी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

प्रसाद जोशी
Tuesday, 4 August 2020

मुसळधार पावसाने वसईला जोरदार झोडपले असून, रस्ते पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याचबरोबर वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पावसाचा जोर असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले.

 

वसई : मुसळधार पावसाने वसईला जोरदार झोडपले असून, रस्ते पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याचबरोबर वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पावसाचा जोर असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले.

Mumbai Rain Alert:पुढचे ३ तास धोक्याचे,नागरिकांना सतर्कतेचा इशाराृ

काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. वसई, विरार, नालासोपारा शहरात पावसाने हाहाकार माजविला असून, सखल भागांत पाणी साचू लागले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर इमारतीही पाण्याखाली येण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. एकीकडे नालेसफाई केल्याचा दावा केला जात असला तरी पाण्याचा निचरा होत नाही.

वसई पूर्वेकडील भोईदापाडा हा मार्ग जूचंद्र, नायगावला जोडला गेला आहे; परंतु या रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली; तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा, ससूपाडासह आजूबाजूच्या परिसरात पाणी साचल्याने महामार्गावरून वाहनांना जाणे मुश्किल झाले. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज, गालानगर, सेंट्रल पार्क, ओसवाल नागरी, संतोषभुवन, पेल्हार,आचोळे मार्ग येथील रस्ते पाण्याखाली आले. गटारे तुडुंब भरल्याने घाणीचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच विरार बायपास, कारगिल नगर, मनवेलपाडासह अन्य परिसरात पाणी साचले आहे.

मुंबई तुंबली!, मुसळधार पावसाचा फटका रेल्वेच्या अत्यावश्यक सेवेवर

वसई, नालासोपारा पश्चिम येथील सोपारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गावर पावसाच्या पाण्याने रस्ते दिसेनासे झाले आहेत. सातिवली, वालीव येथील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर अशीच परिस्थिती पाहावयास मिळत असून, कामगार वर्गाचे यामुळे हाल झाले. वसई गाव येथील तहसीलदार, पंचायत समिती, न्यायालय, भूमापन कार्यालय, पोलिस ठाणे या ठिकाणी जाणाऱ्या सागरशेत मार्गावर पाणी साचले आहे. वसई गाव येथील गिरीज डोंगरी मार्गावर वटवृक्ष आहेत. यातील एक वृक्ष उन्मळून पडला, तर वसई-विरारमधील काही छोटी झाडेदेखील कोसल्याच्या घटना घडल्या.

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads in Vasai-Virar flooded in low lying areas; Citizens suffer from traffic jams

टॉपिकस