मुंबईतल्या BKC कोविड केंद्रातील रुग्णांच्या सेवेसाठी रोबो दाखल

भाग्यश्री भुवड
Friday, 23 October 2020

कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी वांद्रे येथील कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मैदानावर सर्वात मोठे कोविड केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कोविड केंद्रात कोरोना रोखण्यासाठी आता रोबो दाखल झाला आहे. 

मुंबई: कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी वांद्रे येथील कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मैदानावर सर्वात मोठे कोविड केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कोविड केंद्रात कोरोना रोखण्यासाठी आता रोबो दाखल झाला आहे. 

आगामी काळात ही कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते. मात्र, यामुळे कर्मचाऱ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा रोबो मदत करणार आहे. एका आठवड्यापूर्वी या कोविड केंद्रात या रोबोचे उद्घाटन करण्यात आले. अन्न, पाणी आणि औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या व्यतिरिक्त हा रोबोट रुग्णांना टेलीमेडिसीन आणि त्यांचे पल्स ऑक्सिमीटरही चेक करणार आहे. 

IITच्या माध्यमातून हा रोबो नाकारण्यात आला आहे. रोबोच्या माध्यमातून रुग्णांना चहा नाष्टा देणे, ऑक्सिजन लेव्हल तपासणे, सर्व विभाग सॅनिटायझ करणे ही मदत होणार आहे. यासोबतच ईसीजी देखील काढण्यात येत आहे. सध्या हा रोबो आल्यामुळे मनुष्यबळ देखील कमी लागत आहे तसेच कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांपर्यत प्रत्यक्ष नर्स आणि डॉक्टरांना देखील जाण्याची गरज कमी झाली आहे. या रोबोची आणखी एक विशेष बाब म्हणजे घर बसल्या आपल्याला आपल्या रुग्णालयात दाखल नातेवाईकांशी देखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलता येणार आहे. 

अधिक वाचा-  जितेंद्र आव्हाड यांची सूचना तरी ऐका, भाजपची मागणी

सध्या मुंबईत कोरोना बाधित होण्यामध्ये डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय यांची देखील संख्या जास्त आहे. ही बाब लक्षात घेत आता हा रोबो आणण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी करण्याचा प्रयत्न

कोविड केंद्रात सध्या बेड्स वाढवल्यामुळे रुग्णांचा भार वाढला आहे. शिवाय हेल्थकेअर वर्कर्स पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे, पालिकेचा आणि कर्मचाऱ्यांचा भार कमी करण्यासाठी हा रोबो आणण्यात आला आहे. पल्स ऑक्सिमीटर, ताप चेक करणे, जेवण देणे, औषधं देणे ही कामे या रोबोतर्फे केली जातील. ज्यातून पीपीई किट्स घालून डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोना कक्षात जायची जास्त गरज पडणार नाही.

डॉ. राजेश ढेरे, संचालक, बीकेसी कोविड केंद्र

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Robot for patient service at BKC covid Center in Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robot for patient service at BKC covid Center in Mumbai