Mumbai Rode Pit News : गोरेगावात रस्ता खचल्याने ट्रक गेला खड्ड्यात !

goregaon accident
goregaon accidentsakal

Mumbai Rode Pit : गोरेगावात नागरी निवारा वसाहतीतील आय. टी. पार्क जवळील नाल्याची संरक्षक भिंत पडली काल २४ जुलै रात्री ८:३० च्यासुमारास ही घटना घडली. नाल्याची ही भिंत पडल्याने नाल्या जवळील रस्ता खचला आणि तिथे पार्क केलेला ट्रक खचलेल्या रस्त्यात अडकला. त्या ट्रकला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

हा खचलेला रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आय. टी. पार्क जवळील एक मार्गिका बंद करण्यात आलेली आहे. इकडे नोकरी साठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा आहे. एक मार्गीका बंद असल्या कारणाने आज २५ जुलै रोजी सकाळी इकडे वाहतूक कोंडीही पहावयास मिळाली.

"गोरेगाव पूर्व आयटी पार्क जवळ महानगर पालिकेच्या नाल्याची ही भिंत खचली , सुदैवाने मोठी दुर्घटना होता होता राहिली. परंतु सदर नाल्याच्या दुरुस्ती साठी जून २०२१ला महानगर पालिकेला अर्ज करून हि अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले.

अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाचा त्रास आता सामान्य जनतेला होत आहे याची अधिकारी दिलगिरी व्यक्त करतील का? आणि हा सदर रस्ता बनविण्यासाठी वेळ लागेल सध्या पावसाचे थैमान आहे त्यात आता हा रस्ता बंद असल्याकारणाने वाहतूक कोंडी होत आहे. आणि अश्या प्रकारच्या घटनेमुळे लोकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे." असे तेथील मनसे कार्यकर्ते विजय बोरा यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com