
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी सर्वांत तरुण आमदार आणि दिवंगत ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची तर पक्षाच्या गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड रविवारी करण्यात आली आहे. आमदार उत्तम जानकर यांच्यावर प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.