विरारचा रोहित करणार माऊंट कांगटोची चढाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

विरार ः विरारमधील रोहित पाटील याची अरुणाचल प्रदेश येथील माऊंट कांगटो या पर्वतावर गिर्यारोहण करण्यासाठी निवड झाली आहे. संपूर्ण भारतातून फक्त 10 गिर्यारोहकांची निवड झाली असून मोठ्या पर्वतावर चढाई करण्याचा पालघर जिल्ह्यातील गिर्यारोहक होण्याचा मान रोहितला मिळाला आहे. 

विरार ः विरारमधील रोहित पाटील याची अरुणाचल प्रदेश येथील माऊंट कांगटो या पर्वतावर गिर्यारोहण करण्यासाठी निवड झाली आहे. संपूर्ण भारतातून फक्त 10 गिर्यारोहकांची निवड झाली असून मोठ्या पर्वतावर चढाई करण्याचा पालघर जिल्ह्यातील गिर्यारोहक होण्याचा मान रोहितला मिळाला आहे. 

माऊंट कांगटो या पर्वताची उंची 23,260 फूट आहे. या गिर्यारोहणासाठी निवड होण्यासाठी रोहितने कठीण परिश्रम केले आहेत. सुरुवातीला रोहितने अनेक ट्रेकिंगचा अनुभव घेतला. नेपाळ येथील 12,467 फूट उंचीवरील जोमसोम मुक्तीनाथ शिखर, लडाख येथील 29,190 फूट स्टोक कांगरी माऊंटन शिखर, लडाख येथील 11,123 फूट उंचीवरील चंदर ट्रेक (फ्रोझन रिव्हर) येथे -25 डिग्री तापमानात ट्रेकिंग करावे लागतात. या ट्रॅकचा रोहित टीम लीडर होता. तर 2017 ला हिमाचल माऊंटनरिंग इन्स्टिट्यूट येथील बेसिक आणि ऍडव्हान्स माऊंटरिंग कोर्स त्याने पूर्ण केला असून त्याला खास अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.

2019 मार्चमध्ये "नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनेरिंग' येथून सर्च अँड रेस्क्‍यू माऊंटनेरिंग कोर्स ए ग्रेड सर्टिफिकेट त्याने मिळवले आहे. या यशस्वी कोर्समुळे रोहितची निवड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनेरिंग अँड ऑलिड स्पोर्टस (एनआयएमएएस) या भारतातील सर्वात उच्च इन्स्टिट्यूटने माऊंटनेरिंग एक्‍सपीडिशनसाठी केली आहे. यासाठी भारतातून फक्त 10 जणांची निवड केली आहे. या बॅचबरोबर इंडियन आर्मीचे जवानही सहभागी होणार आहेत. 

लेखपाल असूनही सराव कायम 
अर्नाळा विरार येथे राहणारा रोहित पाटील हा अमेय ग्रुप येथे लेखापाल म्हणून कार्यरत असून अमेय क्‍लासिक क्‍लब; यशवंतनगर येथे नेहमी सराव करतो. रोहितने आणि त्याच्या पालकांनी सहकार्याबद्दल माजी महापौर राजीव पाटील यांचे आभार मानले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit patil of Virar is selected for Climbing Mount Congo