रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंना केला फोन अन् म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या विजयाबद्दल फोनवरून शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरे यांनीही रोहित पवार यांना शुभेच्छा दिल्या. 

रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजय झाला. तर आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. या विजयाच्या पार्श्वभूमीवरच रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यातील मोठ्या पक्षाच्या नेत्यांचा विजय झाला. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणातील नवी पिढी त्यांची राजकीय संस्कृती यातून भविष्यात महाराष्ट्रातील सक्षम राजकारण दिसून आलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit pawar wishing Aditya Thackeray for his Victory in Vidhan Sabha Election