esakal | BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार

मुंबई महानगर पालिकेच्या समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.

BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार

sakal_logo
By
समीर सुर्वेमुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.प्रत्येक समिती भाजपची सदस्य संख्या शिवसेने पेक्षा फक्त एकने कमी असल्याने विरोधक या निवडणुकीत काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार - अनिल देशमुख

मुंबई महानगर पालिकेच्या समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होतात.मात्र,यंदा कोविडमुळे पालिकेचे कामकाज बंद असल्याने या निवडणुका अद्याप झालेल्या नाही.राज्य सरकारने गेल्या आठवड्यात पालिकेला या निवडणुका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्याचे आदेश दिले आहेत.त्यानंतर भाजपनेही या निवडणुका घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांना पत्र दिले आहे.
स्थायी समितीसह शिक्षण,सुधार आणि बेस्ट या चार वैधानिक समित्यांमध्ये भाजपचा शिवसेने पेक्षा एक सदस्य कमी आहे.तर,विषय समित्यांमध्ये भाजपची सदस्य संख्या शिवसेने पेक्षा दोन न कमी आहे.सदस्यांच्या संख्येत फारसा फरक नसल्याने या निवडणुकीत विरोधकांची भुमिका महत्वाची ठरू शकते.त्यातच अर्थसंकल्पातील निधी वाटपावरुन सर्वच विरोधक शिवसेनेवर नाराज आहे.त्यामुळे ही नाराजी समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला महागात पडू शकते.

भाजपने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडला तेव्हा महापालिकेत महाविकास आघाडी आम्ही विरोधात आहोत अशी सुचक प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली होती.तर,आताही कॉंग्रेसकडून कोणतीही भुमिका मांडण्यात आलेली नाही.

शिक्षण समितीत बिगर नगरसेवक मिळून शिवसेनेचे 11 सदस्य आहे.तर,भाजपचे 9 सदस्य आहेत.मात्र,बिगर सदस्यांच्या मतदानाचा अधिकाराचा मुद्दा नेहमीच उठवला जातो.मात्र,त्याला आता पर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही.शिक्षण समितीत अध्यक्ष पद मिळवण्यासाठी भाजपला कॉंग्रेस बरोबरच हात मिळवणी करावी लागणार आहे.

How's the Josh! लडाखमध्ये हिवाळ्यातही मोठ्या युद्धाची भारतीय सैन्याची क्षमता; सेनादलाचे आत्मविश्वासपूर्ण विधान

शिक्षण समितीचा अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिध्द असतो.तर,स्थायी समिती शिवसेनेचे 11 आणि भाजपचे 10 सदस्य आहेत.

सुधार समितीत शिवसेनेचे 11 आणि भाजपचे 10 सदस्य आहेत.तर,बेस्ट समितीत शिवसेनेचे 7 आणि भाजपचे 6 सदस्य आहेत.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )