मुंबई : RPF जवानाच्या सतर्कतेमुळे मिळाले 24 लाखांचे चोरीचे दागिने | crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested
मुंबई : RPF जवानाच्या सतर्कतेमुळे मिळाले 24 लाखांचे चोरीचे दागिने

मुंबई : RPF जवानाच्या सतर्कतेमुळे मिळाले 24 लाखांचे चोरीचे दागिने

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनसवर (Bandra Terminus) एक व्यक्ती मोठी बॅग घेऊन उभा होता. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कर्तव्यवरील आरपीएफ (RPF) जवानाने त्याची चौकशी केली. मात्र, त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरपीएफ जवानाने त्याला पकडून ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, 23.60 लाख रुपयांचे चोरी केलेले दागिने, मौल्यवान वस्तू जप्त करण्यात (Gold property seized) आल्या आहेत. तर, पुढील कार्यवाही रेल्वे पोलिसांच्या हवाली देण्यात आली आहे. (RPF alert on bandra terminus and seized twenty four lac gold property and arrested thief)

हेही वाचा: नवी मुंबई : ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करामध्ये सूट?

वांद्रे टर्मिनसवर शनिवारी, (ता.1) रोजी पहाटे 4.30 वाजता आरपीएफ जवान गस्तीवर होता. यावेळी, एक मोठी जड बॅग घेऊन एक व्यक्ती टर्मिनसवर येत होता. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जवानाने त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने कुटुंबियांना घेण्यासाठी आलो आहे, असे कारण सांगितले. त्याच्याकडे फलाट तिकिटाची मागणी केली असता, फलाट तिकीट देखील नव्हते. संबंधित व्यक्ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होता. तर, चोर नजरेने आरपीएफ जवानाला बघत होता. यावर आरपीएफ जवानाला खात्री पटली की, काही तरी गडबड आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला आरपीएफ पोस्ट वर येण्यास सांगितले. त्यानंतर तेथून पळ काढण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला. तेवढ्यात जवानाने त्याला पकडून आरपीएफ पोस्टवर आणण्यात आले.

Gold

Gold

आरपीएफ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता, त्याने सांगितले की, 1 जानेवारी रोजी वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी भागात घरफोडी केली. त्यानंतर आरपीएफ विभागाने तत्काळ रेल्वे पोलीस आणि निर्मल नगर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती कळवली. चोरी करण्यात आलेल्या सामग्रीत 22 लाख 48 हजार 400 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या नाणी, 17 हजार 500 रुपयांचे चांदीचे दागिने आणि चांदीची नाणी, एका पिगी बँकसहित 20 हजार 748 रुपये रोख रक्कम, 73 हजार रुपये किंमतीची 14 घड्याळे अशा सर्व मौल्यवान वस्तू बॅगेत मिळाल्या. असा एकूण 23 लाख 60 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर, पुढील कारवाईसाठी आरोपीला रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsCrime News
loading image
go to top