आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे महिला प्रवाशाचा जीव वाचला; मुंब्रा स्थानकावरील घटना सीसीटीव्हीत कैद

प्रशांत कांबळे
Sunday, 13 December 2020

मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रंमाक दोन वर नाजिया सहजाद शेख आपल्या मुलीबरोबर सीएसएमटीला जाण्यासाठी लोकल ट्रेंनची वाट पाहत उभी होती.

मुंबई  :  लोकल ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्नात असलेल्या महिलेला स्थानकावर पडण्यापासून वाचवण्यात आले आहे. मुंब्रा स्थानकावरील ही घटना असून, स्थानकावर कार्यरत आरपीएफ जवान मंगेश वाघ यांच्या सतर्कतेमुळे महिला प्रवाशाला जीवनदान मिळाले असून, घटना स्थानकावरील सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शनिवारी रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रंमाक दोन वर नाजिया सहजाद शेख आपल्या मुलीबरोबर सीएसएमटीला जाण्यासाठी लोकल ट्रेंनची वाट पाहत उभी होती. यादरम्यान लोकल ट्रेन येताच नाजिया सहजाद शेखची मुलगी लोकल ट्रेनमध्ये चढत असतांना नाजिया यांचा स्थानकाच्या बाजूने तोल गेला, मात्र स्थानकावर कर्तव्यबजावणार्या मंगेश वाघ यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी नाजिया यांना डब्यात चढण्यासाठी धावत्या ट्रेन मध्ये धावून आलेत. 

नाताळ - नववर्षांसाठी विशेष गाड्या धावणार; मंगळवारपासून प्रवाशांना बुकिंगची सुविधा

त्यामुळे वेळीच जीवघेणी घटना थोडक्यात टळली, हा संपूर्ण प्रकार स्थानकावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, डब्यातील महिला प्रवाशांनी वाघ यांचे कौतुक केले असून, नाजीया यांनी धान्यवाद मानले आहे.

The RPF personnel saved the life of the female passenger at Mumbra station

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The RPF personnel saved the life of the female passenger at Mumbra station