मुंबईकरांसाठी संघही सरसावला! 2000 कुटूंबांना शिधा वाटप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

  • जनकल्याण समितीकडून 
  • 2000 कुटुंबांना शिधा 

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे पश्‍चिम उपनगरांमधील 2000 गरीब कुटुंबांना महिनाभराचा शिधा देण्यात येत आहे. देणगीरूपात मिळालेल्या नऊ लाख रुपयांमधून 17 टन धान्य आणण्यात आले. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोजंदारी थंडावल्याने पश्‍चिम उपनगरांमधील गरीब कुटुंबांना रोजचे जेवण मिळवण्यासाठीही धडपड करावी लागत असून, गावी जाणेही शक्‍य नाही. ही अडचण सोडवण्यासाठी जनकल्याण समितीने दानशूरांना देणगी देण्याचे आवाहन केले. त्यानुसार कॅनबरा इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक करुणाकर शेट्टी यांनी सीएसआर फंडातून पाच लाख रुपये दिले. मालाडच्या सोन्या मारुती सेवा समितीने एक लाख रुपये, मेलोडी हेल्थकेअर प्रा. लि. ने 50 हजार आणि डी. नवीनचंद्र एक्‍सपोर्टसतर्फे 25 हजार रुपये देण्यात आले. सनदी अधिकारी मनमोहन जुनेजा, योगेश वर्मा आणि अनेकांनी मदत केली. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

 रकमेतून जनकल्याण समितीने वाशीतील एपीएमसी मार्केटमधून सहा टन तांदूळ, चार टन गव्हाचे पीठ, 2000 लिटर तेल, 2000 किलो तूरडळ, 2000 किलो साखर, 500 किलो चहा पावडर व 2000 किलो मीठ आणले. प्रत्येकी तीन किलो तांदूळ, दोन किलो गव्हाचे पीठ, एक किलो तूरडाळ, मीठ व साखर, एक लिटर तेल व पाव किलो चहा पावडर असा शिधा गोरेगाव, मालाड व कांदिवली येथील गरीब कुटुंबांना वितरित केला जाईल. समितीचे सात नगर कार्यवाह आणि वस्तीप्रमुख या 2000 कुटुंबांच्या घरी जाऊन वाटप करतील. यापुढेही अशी मदत दिली जाईल, असे विजय कोंडाळकर व भूषण पैठणकर यांनी "सकाळ'ला सांगितले.

rss helps mumbai Distribution of food to 2000 families


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rss helps mumbai Distribution of food to 2000 families