
डोंबिवली : कल्याण डोंबिवली मधील 65 बेकायदा बांधकाम प्रकरण गाजत असतानाच ठाणे जिल्ह्यातील ठाणे, अंबरनाथ, कल्याण तालुक्यात शासकीय भूखंडावर 896 बेकायदा बांधकामे उभी राहिली असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोईर यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली असून यात कल्याण तालुक्यातील 327 तर अंबरनाथ तालुक्यात 550 बांधकामाचा समावेश आहे.