वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना RTO चा दणका, ४० हजारांपेक्षा जास्त चालकांवर कारवाई

Traffic-Police
Traffic-Policesakal media

मुंबई : वाहतुकीच्या नियमांना (RTO rules0 धाब्यावर बसवून सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा (RTO action) उगारला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल 40 हजार 305 वाहन चालकांचा (driver) चालक परवाना रद्दचा (license cancelled) प्रस्ताव परिवहन विभागाकडे (RTO) पाठविण्यात आला आहे. गेल्यावर्षी फक्त 17 हजार 944 चालकांचा चालक परवाना रद्द करण्यात आले होते. (RTO action on vehicle drivers for breaking rules licenses cancles-nss91)

राज्यातील रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या नागरिकांच्या मुसक्या आवळण्याठी वाहतूक विभाग प्रयत्न करत आहे. मात्र, तरी सुद्धा वाहन चालकांकडून सतत वाहतूक नियम तोडले जात असल्याने वाहतूक विभागाची डोके दुखी वाढली आहे. यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान राज्यभरात वाहतूक विभागाकडून वाहतूक नियम मोडणाऱ्या 14 लाख 75 हजार 101 वाहन चालकांनावर कारवाई करण्यात आली. याकारवाईत राज्यभरातील 40 हजार 305 वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम वारंवार मोडल्यामुळे त्यांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने परिवहन विभागाला पाठवण्यात आला आहे.

Traffic-Police
संस्काराच्या शिदोरीतील गुणदर्शन; ...पण चिमुकल्याला वाचवला!

मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल ओलांडणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतू करणे, वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर करणे, दारू पिऊन वाहन चालविणे आदी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे.

नागपुरातील चालक परवाने सर्वाधिक रद्द

यावर्षीही नागपूरकरांवर कारवाईची संक्रात कायम आहे. कारवाईमध्ये दोषी आढळून सर्वाधिक चालक परवाना रद्द करण्याची नागपुरातील सर्वाधिक संख्या आहे. राज्यभरात गेल्यावर्षीही 9635 चालक परवाने रद्द करण्यात आले होते. यावर्षी यामध्येही दुप्पट प्रमाण वाढले असून, यावर्षी याच सहा महिन्यात 28 हजार 36 चालक परवाने रद्द करण्यासाठी पाठवण्यात आल्याने, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये नागपूरकर यावर्षीही अव्वल असल्याचे आढळून आले आहे.

सर्वाधिक चालक परवाना रद्द होणाऱ्यांची माहिती

विभाग - एकूण कारवाई संख्या - रद्द परवाना संख्या

नागपूर शहर - 71690 - 28036

मुंबई शहर - 265985 - 3149

हायवे पोलीस - 633051 - 2918

नवी मुंबई - 61380 - 2133

ठाणे शहर - 45522 - 506

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com