ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी आरटीपीसीआर केंद्र; जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यश

ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी आरटीपीसीआर केंद्र; जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यश

ठाणे  - ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग, महसूल विभाग दिवसरात्र झटत आहे. अशातच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती तत्काळ मिळवून त्यांना उपचाराखाली आणत अटकाव करण्यास मदत होणार आहे. ही बाब लक्षात घेवून, ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रासह एक नगरपालिका तर, ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्राची जिल्हा नियोजन निधीतून उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन निधीतून पाच आरटीपीसीआर केंद्र उभारणारा ठाणे जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीसपासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातील महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी देखील पहिल्या दिवसापासून दिवसरात्र कार्यरत आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने शिरकाव केल्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने झपाट्याने वाढ होत होती. त्यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन निधीतून आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे चाचणीचे परमन वाढविण्याबरोबरच त्याचे निदान करण्यासाठी जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रासह एक नगरपालिका आणि ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच ठिकाणी आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा नियोजन निधीतून या केंद्रांच्या उभारणीसाठी व साहित्यांच्या खरेदीसाठी आठ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर 10 हजार आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) कीट देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

 या ठिकाणी उभारले केंद्र

   भिवंडी, मीरा भाईंदर, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांसह बदलापूर-अंबरनाथ नगरपरिषदमध्ये एक आणि ग्रामीण परिक्षेत्रातील पडघा येथे आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणी दिवसाकाठी 200 ते 250 चाचण्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

...................................................

जिल्ह्यात सहा हजार 602 रुग्ण घेतायेत उपचार

      ठाणे जिल्ह्यात मागील सात ते आठ महिन्यात दोन लाख 34 हजार 875 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी दोन लाख 22 हजार 483 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. तर, पाच हजार 790 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात सध्याच्या घडीला जिल्ह्यात सहा हजार 602 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

    ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी व आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच जिल्ह्यात पाच ठिकाणी आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्र उभारणारा ठाणे हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला असून ह्या केंद्रांमध्ये जिल्ह्यात भविष्यात उद्भवणाऱ्या विविध साठीच्या आजारांच्या देखील चाचण्या करणे शक्य होणार आहे.

-      अमोल खंडारे,
जिल्हा नियोजन अधिकारी, ठाणे.

RTPCR centers at five places in Thane district

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com