नाताळ, नववर्षासाठी BMC कडून सोमवारी नियमावली जाहीर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाताळ, नववर्षासाठी BMC कडून सोमवारी नियमावली जाहीर होणार

नाताळा आणि नववर्ष साजरा करण्यासाठी सोमवारी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. यात,रात्री उशीराने सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास मर्यादा येऊ शकते.

नाताळ, नववर्षासाठी BMC कडून सोमवारी नियमावली जाहीर होणार

sakal_logo
By
समीर सुर्वेमुंबई :  नाताळा आणि नववर्ष साजरा करण्यासाठी सोमवारी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. यात,रात्री उशीराने सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास मर्यादा येऊ शकते.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोविड मुळे यंदाच्या वर्षात सर्व सण साजरे करण्यासाठी बंधने आणण्यात आली होती.नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरावड्या पासून लॉकडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलता मिळाली आहे.त्यानंतर डिसेंबर मध्ये बार आणि पब मध्ये सर्व नियमडावलून पहाटे पर्यंत व्यवसाय सुरु असल्याचे आढळले.हे प्रकार लक्षात आल्यावर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून रात्रीची संचार बंदी लागू करण्याची विनंती केली होती.मात्र,20 डिसेंबर पर्यंत परीस्थीतीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असे राज्य सरकारने पालिकेला कळवले आहे.त्यातच,नाताळा आणि नववर्ष साजरे करण्यासाठी नियमावलीही पालिका तयार करणार आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनी सर्रासपणे ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक; उच्च न्यायालयात याचिका दाखल

शुक्रवार(ता.२५) पासून नाताळ सण सुरु होणार आहे.त्यासाठी सोमवारी (ता.21 ) नियमावली पालिका जाहीर करु शकते.31 डिसेंबरला रात्रीच्या वावरावर मर्यादा येऊ शकते.तसेच,फटाके फाेडण्यावरही बंदी येण्याची शक्यता आहे.

Rules for Christmas New Year will be announced by BMC on Monday

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top