धावपटू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणूक; क्रीडा कोट्यातून रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे नियुक्ती

वसंत जाधव
Saturday, 28 November 2020

 जागतिक स्तरावर पीटी उषा आणि कविता राऊत यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या सातारा जिल्हयातील खेळाडू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणुक करण्यात आली आहे.

नवीन पनवेल - जागतिक स्तरावर पीटी उषा आणि कविता राऊत यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या सातारा जिल्हयातील खेळाडू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणुक करण्यात आली आहे. क्रीडा कोट्यातून त्यांनी रायगड जिल्हयातील माणगाव या ठिकाणी प्रभारी तहसीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहेत.

हेही वाचा - नवी मुंबईतील कोव्हिड टेस्टिंग घोटाळाप्रकरणी आयुक्तांची कारवाई; कोव्हिड टेस्टिंग इन्चार्ज निलंबित

सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या छोटयाशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर शेतमजूर कुटुंबातील आहेत. जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धांमध्ये मध्यम व लांब अंतराच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले. त्यानंतर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला.

हेही वाचा - कराची बेकरीचे मालक फाळणीतील हिंसेचे बळी; मनसेच्या नोटीशीला दिले उत्तर

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने 2015 सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना स्पोर्ट्स पर्सन ऑफ दी ईयर असे म्हटले होते. त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. शासनाने त्यांना यापूर्वीच सेवेत घेतलं आहे. सध्या त्यांचा परिविक्षाधीन कालावधी सुरू आहे

Runner Lalita Babar appointed Tehsildar in charge Appointment at Mangaon in Raigad district from sports quota

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Runner Lalita Babar appointed Tehsildar in charge Appointment at Mangaon in Raigad district from sports quota