लोकल सर्वसामान्यांना बंद पण डब्यात वाढली प्रवाशांची धक्काबुक्की

रस्ते मार्गाने नोकरीचे ठिकाण गाठणे खिशाला परवडणारे नाही
mumbai local
mumbai localfile photo

मुंबई: लोकल प्रवासात (mumbai local) फक्त अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांना प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना लोकल प्रवासात अत्यावश्यक सेवेत सर्वसामान्य प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. सकाळ आणि सायंकाळच्यावेळी लोकलमध्ये प्रवाशांची पूर्वीसारखी धक्काबुक्की, दरवाज्यावर उभे राहून प्रवास करणे, असे प्रकार सुरू झाले आहेत. 1 जून ते 15 जून या मागील 15 दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या तब्बल 31 लाखांपर्यंत पोहचली आहे. (Rush in mumbai local service increases)

'ब्रेक द चेन' अंतर्गत लोकल प्रवासास मोजक्याच अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय सेवेतील, रुग्ण, दिव्यांग यांना परवानगी दिली आहे. मात्र, पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडून लोकल प्रवासास सुरूवात केली आहे. रस्ते मार्गाने नोकरीचे ठिकाण गाठणे खिशाला परवडणारे नसल्याने आणि पैशांचा अपव्यय होत असल्याने अनधिकृतपणे सर्वसामान्य प्रवासी लोकल प्रवास करत आहेत.

mumbai local
डॉक्टरनेच महिला सहकाऱ्याचा केला विश्वासघात, मालाडमधील घटना

कल्याण-कसारा, कर्जत, खोपोली, वसई-विरार, नालासोपारा या भागातून रस्ते मार्गाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यासह कल्याण, डोंबिवली येथून बसने प्रवास केल्याने कंबर दुखी, मणक्याचे आजार वाढण्याचे कारण ठरत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती, वाहतूककोंडी, मुसळधार पाऊस, कमी झालेला पगार, वाया जाणारा वेळा यामुळे प्रवासी प्रचंड वैतागले आहेत. तसेच लोकलची उणीव भरून काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने बेस्ट मार्गासाठी 1 हजार एसटी सुरू केल्या. मात्र, आवश्यकता नसल्याचे सांगत या गाड्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे खासगी आस्थापनांमधून कामकाज सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहेत. त्यामुळे अनधिकृत सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुरू आहे.

mumbai local
शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना 'इडी'कडून अटक

घरातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने महिन्यांच्या खर्चाचे गणित जुळले जात नाही. तसेच वाहतूक खर्च वाढल्याने प्रवाशांचे जगणे कठिण झाले आहे. प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला करण्यात यावा. कोरोनाचे लसीचे दोन डोस घेतल्यासाठी उपनगरीय लोकल सुरू करण्यात यावी. प्रशासनाने तत्काळ रेल्वे सेवा सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे उपनगरीय प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com